पोल्ट्री शेड अनुदान महाराष्ट्र 2025

पोल्ट्री शेड अनुदान महाराष्ट्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसोबतच शेतीला पूरक असा कोणता तरी जोडधंदा करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील बहुतांश तरुण शेती सोबत शेती जोड व्यवसाय शोधत असतात. शेतीला पूरक असा एखादा व्यवसाय मिळाल्यास शेतकरी कुटुंब त्यांची उपजीविका सहज रीतीने भागू शकतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.

पोल्ट्री शेड अनुदान महाराष्ट्र शेती पूरक व्यवसाय ज्यामध्ये दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय शेतीसोबत शेतकऱ्यांना करणे सोयीचे होते. यातच बहुतांश तरुण शेतकरी कुक्कुटपालन या कडे वळत आहेत. या व्यवसायाला मागणी देखील खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. कुक्कुटपालन हा व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना कमी पैशात देखील या व्यवसायाची उभारणी करता येते. हा व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान देखील वितरित केले जाते हे अनुदान कसे मिळवावे यासाठी काय पाहतात असते अर्ज कसा करायचा कोणती कागद करावी लागतात याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पोल्ट्री शेड अनुदान महाराष्ट्र काय आहे योजना

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पोल्ट्री व्यवसायात वाढ करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना पोल्ट्री व्यवसायासाठी जास्तीत जास्त 50 लाख रुपयापर्यंत कर्ज वितरित केले जातात. या कर्जावर शेतकऱ्यांना 50 टक्के एवढे अनुदान देखील वितरित केले जाते.


उदाहरणार्थ जर तुम्ही 40 लाख रुपये कर्ज घेतले तर तुम्हाला त्या कर्जावर 50% सवलत मिळून तुम्हाला 20 लाख रुपये एवढी रक्कम परत करावी लागते.

पोल्ट्री फार्म साठी कोणाला कर्ज मिळू शकते

पोल्ट्री फार्म हा व्यवसाय करण्यासाठी स्वतः शेतकरी, सर्वसामान्य व्यक्ती, बचत गट, उद्योजक, शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, कंपनी कायद्याच्या कलम 8 अंतर्गत निर्माण झालेल्या संस्था. यापैकी कोणीही या कर्जासाठी अर्ज करू शकते. हे कर्ज राष्ट्रीयकृत बँकेच्या मार्फत वितरित केले जाते.

पोल्ट्री शेड अनुदान महाराष्ट्र अर्ज प्रक्रिया

पोल्ट्री फार्म कर्ज मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो यासाठी सरकारकडून राष्ट्रीय पाळीव पश मिशन पोर्टल (नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन पोर्टल) निर्माण करण्यात आलेली आहे.

कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे नावे कमीत कमी एक एकर जमीन असणे बंधनकारक आहे. या संबंधित कागदपत्र अर्जासोबत जोडणे देखील महत्त्वाचे आहे. जर अर्जदाराच्या नावावर स्वतःची जमीन नसेल तर भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीवरील कर्ज घेता येते; परंतु अशावेळी मिळणारे कर्ज हे कर्जदार आणि जमीन मालक अशा दोघांच्या नावे वितरित केले जाते.

पोल्ट्री शेड अनुदान महाराष्ट्र


कर्ज घेण्यासाठी व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजेच प्रकल्प अहवाल सादर करावा लागतो. या प्रकल्प अहवालामध्ये तुम्ही कशा पद्धतीने या व्यवसायाची निर्मिती करणार आहात, त्यासोबतच घेतलेल्या कर्जाची कशा पद्धतीने परतफेड करणार आहात याची सविस्तर माहिती त्या रिपोर्टमध्ये देणे आवश्यक आहे. पोल्ट्री शेड अनुदान महाराष्ट्र

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • प्रकल्प अहवाल
  • जमिनीची कागदपत्रे
  • ज्या ठिकाणी व्यावसायिक उभा करायचा आहे त्या ठिकाणचा नकाशा
  • पॅन कार्ड
  • मतदान कार्ड
  • बँक खात्याचे स्टेटमेंट
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • कर्जदाराचा पासपोर्ट फोटो

अर्ज करताना घ्यावयाची काळजी

पोल्ट्री शेड अनुदान महाराष्ट्र अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असून अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची चूक करू नये. अर्ज करताना मोबाईल नंबर व्यवस्थित भरावा. आपण भरलेल्या मोबाईल क्रमांक वर एक ओटीपी पाठवण्यात येईल. आपली सर्व कागदपत्रे स्पष्ट असावीत. आपल्याला किती रक्कम कर्ज स्वरूपात हवी आहे याची संपूर्ण माहिती अर्ज भरताना व्यवस्थित भरावी.


अर्ज करताना तुमचा प्रकल्प अहवाल हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. प्रकल्प अहवालामध्ये नमूद केलेल्या सर्व गोष्टींची तपासणी करूनच प्रकल्प अहवाल अपलोड करावा. ज्यामध्ये तुम्हाला किती पशूंची व्यवस्था करायची आहे, त्यांच्या पालनासाठी किती खर्च येणार, त्यांना खाऊ घालण्यासाठी किती खर्च होईल, त्यासोबतच त्यांच्या संगोपनाबाबत किती खर्च होईल याची सविस्तर माहिती त्यात नमूद असावी.

पोल्ट्री शेड अनुदान महाराष्ट्र

अर्जदाराचा सिबिल स्कोअर चांगला असावा

हे कर्ज राष्ट्रीयकृत बँकेचे मार्फत वितरित केलं जातं. राष्ट्रीयकृत बँका कर्ज वितरित करताना कर्जदाराचे सिबिल रिपोर्ट तपासतात. अर्जदाराचा सिबिल रिपोर्ट चांगला असेल तरच कर्ज वितरित केलं जातं. जर सिबिल रिपोर्ट व्यवस्थित नसेल तर बँक कर्ज देण्यास नकार देते. त्यामुळे अर्जदाराने आधी आपले सिबिल रिपोर्ट तपासावे जेणेकरून नंतर कर्ज मिळवण्यास अडचण निर्माण होणार नाही.

हे वाचा: रासायनिक खताचे दर निश्चित पहा कोणते खत किती रुपयांना मिळणार

प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यकच

कुक्कुटपालन/ पोल्ट्री फार्म हा व्यवसाय करण्यासाठी व्यवसायिक हा अनुभवी असणे आवश्यक आहे. किंवा त्याने याआधी व्यवसायाची प्रशिक्षण घेतलेले देखील असणे आवश्यक आहे. जर अर्जदाराने कुक्कुटपालन प्रशिक्षण घेतलेले नसेल तर कर्ज वितरित केले जात नाही. त्यामुळे अर्ज करण्या आधीच अर्जदाराने कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण घेतलेले असल्याचे प्रमाणपत्र सादर केलेल असणे आवश्यक आहे. पोल्ट्री शेड अनुदान महाराष्ट्र

2 thoughts on “पोल्ट्री शेड अनुदान महाराष्ट्र 2025”

Leave a Comment