jamin mojani : जमिनीची मोजणी आता एक तासात.

jamin mojani : तंत्रज्ञानाच्या जोरावर जग खूप प्रगती करत आहे. खूप कष्टाचे असणारे काम काही मिनिटांमध्ये पार पाडले जात आहे. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाची जोड वाढत आहे या तंत्रज्ञानाच्या जोरावरच प्रत्यक्षेत्र आपल्याला हव्या असणारे कष्ट अगदी सहज आणि काही वेळातच पूर्ण केले जात आहे. यातच आता जमीन मोजणी प्रक्रियेत मध्ये देखील तंत्रज्ञानाचा वापर करून जमीन मोजणी अत्यंत सुलभ आणि वेगाने करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

जमीन मोजणी प्रक्रियेमध्ये रोव्हर प्रक्रियेमुळे जमिनीची मोजणी आता एका तासात पूर्ण होणे शक्य झाले आहे. या वेगामुळे जमीन मोजणी प्रक्रिया लवकर होत आहे ज्यामुळे प्रलंबित असणारे जमीन मोजणी प्रकरणाची संख्या देखील कमी होताना दिसत आहे.

हे वाचा: पोल्ट्री शेड अनुदान महाराष्ट्र 2025

हे पण वाचा:
Msp 2025 Msp 2025 खरीप हंगाम 2025 हमीभाव जाहीर.

मात्र बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या मोजणीला प्राधान्य दिले जात नाही. त्या ठिकाणी बिल्डरांची मोजणी असेल त्याला प्राधान्य देऊन त्यांची मोजणी आधी करून घेण्यात अधिकाऱ्यांना जास्त वाव दिसत आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मोजणीला या ठिकाणी वेळ लागत असल्याच्या तक्रारी देखील शेतकऱ्यांकडून केला जात आहेत.

मोजणी दरात वाढ jamin mojani

वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीच्या मध्ये देखील तुकड्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच वाढत्या नगरीकरणामुळे शहरालगाचे जमिनी मध्ये नवीन इमारती, कॉम्प्लेक्स उभारली जात आहे यामुळे हद्द निश्चित करणे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे वाद मिटवण्यासाठी शेती ची हद्द मोजणी प्रक्रिया द्वारे निश्चित करणे आवश्यक आहे.

मोजणी अर्ज वाढत असल्यामुळे दरात देखील वाढ करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना मोजणी करण्यासाठी पहिल्यापेक्षा दुप्पट दर आकारले जात आहेत. आता नवीन प्रणालीनुसार शेतकऱ्यांना शेत मोजणी करण्यासाठी नियमित मोजणीसाठी 2000 हजार रुपये व तातडीची मोजणी करण्यासाठी 8000 हजार रुपये एवढा शुल्क आकारला जात आहे हा शुल्क जुन्या प्रणालीनुसार नियमित मोजणीसाठी 1000 हजार रुपये व तातडीच्या मोजणीसाठी 3000 रुपये एवढा होता.

हे पण वाचा:
Maharashtra Land Reform Maharashtra Land Reform :शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारजमा झालेली जमीन आता मिळणार परत…
मोजणी प्रकारमोजणीचे जून दरमोजणीचे नवीन दर
नियमित मोजणी प्रक्रिया10002000
तातडीची मोजणी प्रक्रिया30008000

एक तासात मोजणी होते पूर्ण

jamin mojani मोजणी प्रक्रियेमध्ये रोव्हर पद्धतीचा वापर सुरू केल्यामुळे मोजणी प्रक्रिया अत्यंत जलद गतीने पूर्ण होत आहे. एक हेक्टर जमीन मोजण्यासाठी जास्तीत जास्त एक तास कालावधी लागतो. ज्यामुळे एका दिवसामध्ये भरपूर प्रकरणी निकाली लागतात. या जलद गतीचे प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना त्यांची जमीन मोजणी कृपया लवकरात लवकर करून मिळते. jamin mojani

Leave a Comment