upi daily limit: यूपीआय ट्रांजेक्शन मर्यादेत वाढ. एवढे करता येणार व्यवहार.

By md news

upi daily limit- डिजिटल व्यवहार म्हटलं तर आता प्रत्येक दुकानदार तसेच प्रत्येक व्यक्ती या माध्यमातून व्यवहार करत आहे परंतु यामध्ये बऱ्याच वेळा वापर करताना याचा त्रास देखील सहन करावा लागतो. तो म्हणजे यूपीआय व्यवहारावर दैनंदिन लावलेले लिमिट. दिवसेंदिवस डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ होत आहे यामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या ते मोठ्या दुकानावर तसेच रस्त्यावर लावलेल्या छोट्या गाड्यावर सुद्धा UPI द्वारे पेमेंट स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे यामध्ये नागरिकांना आपले व्यवहार करताना लिमिट आल्यामुळे बऱ्याच वेळा वापर करताना नाहक त्रास सहन करावा लागतो यामध्ये आता एमपीएससी आणि दैनंदिन लिमिट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

RBI bank ने दिले होते निर्देश

Upi daily limit ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या आरबीआयच्या बैठकीमध्ये यूपआय व्दारे व्यवहारात दैनंदिन मर्यादेत वाढ करण्यात यावी अशी सूचना देण्यात आली होती. त्यावर कार्य करताना NPCI ने आता दिनांक 16 सप्टेंबर पासून केल्या जाणाऱ्या व्यवहाराच्या मर्यादित वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पाच लाख रुपयांपर्यंत ही मर्यादा ठेवण्यात आली आहे .यामध्ये मान्यता दिलेली आहे त्यासोबतच आरबीआय ने देखील दैनंदिन यूपीआय व्यवहार साठी मर्यादा वाढ करण्याचा निर्णयाला सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना आपल्या यूपीआय द्वारे पेमेंट करण्यासाठी पाच लाख रुपयांची मर्यादा मिळणार आहे. यामुळे युपिआय द्वारे व्यवहार करणाऱ्या वापर कर्त्याला याचा दिलासा मिळणार आहे.

Upi daily limit बँक ना दिल्या सूचना

Npci ने बँकांना सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार बँका आता आपल्या ग्राहकांना यूपीआय द्वारे पेमेंट करण्यासाठी मर्यादा वाढवून देतील यामध्ये बँकांना आपल्या अधिकारानुसार व ग्राहकांच्या सुरक्षा चा विचार करून बँक ग्राहकांना मर्यादा ठरवून देत असते यामध्ये सुरुवातीला काही बँकांनी दिवसाची दहा हजार मर्यादा ठेवली होती तर काही बँकांनी एक लाख रुपयापर्यंत दिवसांची मर्यादा ठेवलेली होती आता या निर्णयानंतर बँकांना मर्यादा वाढवण्याचे सूचना मिळाल्यामुळे बँका आपल्या अधिकाराचा वापर करून किती दैनंदिन व्यवहारात मर्यादा वाढवतात हे पाहणे महत्त्वाचे असेल.

Leave a Comment