pm kisan 18 installment देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने 2019 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना राबवण्याचा निर्णय घेतला या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये म्हणजेच प्रतिमा 500 रुपये या प्रमाणात आर्थिक मदत देण्यात येते यामध्ये दर चार महिन्याला दोन हजार रुपये या प्रमाणात निधी वितरित केला जातो या आर्थिक सहाय्याने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे संगोपन करण्यासाठी तसेच उत्पादन वाढवण्यासाठी उपयोग होतो.
पी एम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 17 हप्त्यांचे वितरण करण्यात आलेले आहे यामध्ये जे शेतकरी योजना पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना दर चार महिन्यानंतर एक हप्ता वितरित केला जातो प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना तीन हप्ते वितरित केल्या जातात म्हणजेच शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये दिले जातात.
pm kisan 18 installment कधी मिळणार 18 हप्ता
pm kisan 18 installment पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याची सर्व शेतकऱ्यांना प्रतिक्षा लागलेली आहे. शेतकऱ्यांना मागील हप्ता म्हणजेच 17 वा हप्ता जून महिन्यात वितरित करण्यात आला होता त्यानंतर पुढील चार महिन्यानंतर म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांना या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे प्रत्येक वेळी या हप्त्यासाठी काही ना काही तरी औचीत साधून केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात येतो यामध्येच पुढील महिन्यात दिवाळी या सणाचे महत्त्व जाणून शेतकऱ्यांना हा 18 वा हप्ता दिवाळीपूर्वी वितरित करण्यात येईल अशी माहिती देण्यात येत आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार अठरावा हप्ता
pm kisan 18 installment जे शेतकरी या योजने अंतर्गत पात्र आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना योजनेच्या माध्यमातून हत्या वितरित केला जाणार आहे, परंतु यामध्ये ज्या शेतकऱ्यांना सतरावा हप्ता मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांची वार्षिक उत्पन्न वाढ झाले आहे किंवा त्यांचे घरातील सदस्य सरकारी कर्मचारी म्हणून नियुक्त झाले असतील अशा कुटुंबातील शेतकऱ्यांना या हप्त्याचे वितरण केले जाणार नाही. त्यासोबतच जर का शेतकऱ्यांची पीएम किसान KYC अपूर्ण असेल तर त्या शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.

केवायसी झाली किंवा नाही कसे तपासावे
pm kisan 18 installment ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेअंतर्गत आपली केवायसी केली आहे त्यांना हप्ता प्रत्येक वेळी मिळत आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे त्या शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित केला जात नाही. शेतकऱ्यांची ठेवायची झाली आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांना https://pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन केवायसी या टॅब मध्ये क्लिक करून आपला आधार नंबर भरून आपली केवायसी झालेली आहे किंवा नाही याबद्दलची सर्व माहिती आपल्याला आपल्यासमोर दिसेल जर आपली केवायसी झाली असेल तर आपल्याला पुढील हप्ता नक्कीच मिळणार आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांची केवायसी पेंडिंग आहे त्यांनी त्या ठिकाणी आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी लागणार आहे kyc पूर्ण केल्यानंतर आपल्याला पुढील हप्ता मिळणार आहे.