ST Strike गणेश उत्सव सुरू होण्यासाठी अव्यय काही दिवस उरलेले असताना महाराष्ट्रात एसटी सेवा विस्कळीत झाले आहे. याचे कारण म्हणजे एसटी कामगाराचा संप (कर्मचारी संप ).
ST Strike एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने आजपासून म्हणजेच दिनांक 3 सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार राज्यातील विविध आगारा मध्ये कामकाज बंद ठेवण्याचं आंदोलन पुकारण्यात आलं.
राज्यातील एकूण 11 कामगार संघटनेच्या कृती समितीने आज आंदोलन पुकारले आहे 3 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत 251 आगारांपैकी 35 आगार पूर्णतः बंद पुकारण्यात आला.
मुंबई उपनगर सर्व आगारातील वाहतूक सुरळीत चालू असल्याचे सांगण्यात आलं. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत चालू आहे. परंतु ठाणे विभाग ,कल्याण विभाग, विठ्ठलवाडी आगार पूर्णतः बंद आहे.
विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरू आहे तसेच बंदचा प्रभाव दिसून आलेला नाही परंतु मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगार बंद ठेवण्यात आले आहेत.
पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर सोलापूर विभागामधील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे.
पुणे जिल्ह्यातील मुख्य असणारे शिवाजीनगर तसेच ,वल्लभनगर, भोर,सासवड, बारामती, तळेगाव हे आगार पूर्णता बंद ठेवण्यात आले आहेत.
याव्यतिरिक्त बाकीच्या आगारात वाहतूक सुरळीत सुरू आहे.
ST Strike एसटी कामगारांच्या मागण्या काय आहेत ?
महाराष्ट्र राज्यातील एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्त्वाच्या प्रश्नाचा निर्णय शासनाकडून होत नसल्यामुळे कामगारांमध्ये निर्माण झालेली नाराजी विचारात घेऊन एसटी महामंडळातील बहुतांश संघटनांनी संयुक्त कृती समिती स्थापन केली.
या समितीद्वारे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन देण्यात यावे. तसेच कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबरोबरच मागील वेतन वाढतील फरक दूर करावा. महागाई भत्त्याची थकबाकी रक्कम त्वरित देणे आणि मागील करारातील त्रुटी दूर करणे याचबरोबर शिस्त व आवेदन पद्धती मधील बदल मेडिकल कॅशलेस योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करणे या प्रलंबित मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलेला आहे.
ST Strike प्रवासावर काय परिणाम होणार
अवघ्या काही दिवसातच गणेश उत्सव येत आहेत यामध्ये भाविक भक्तांची एसटीला प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. परंतु आता हे धरणे आंदोलन पुकारल्यामुळे जर ते गणेशोत्सवापर्यंत संपले नाही तर प्रवाशांना खूप मोठ्या अडचणी निर्माण होणारच. मागच्या वेळी यांच्या आंदोलनांचा फटका सरकार तसेच सर्व सामान्य नागरिकांनी अनुभवलेलाच आहे.