ganpati sthapana muhurat 2024

हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला खूप मोठे महत्त्व दिलेले आहे. हा सण गणपतीच्या उपासनेसाठी समर्पित करण्यात येत आहे. या वर्षी गणेश महोत्सव (ganpati sthapana muhurat 2024 )

६  सप्टेंबर  रोजी दुपारी ३.०१ वाजता सुरू  होईल. असे म्हटले जाते की गणपतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि संकटे नष्ट होतात. यासोबतच जीवनात आनंद येतो.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

  गणेश चतुर्थी, ज्याला विनायक चतुर्थी आणि गणेश चौथ देखील म्हणतात. भाविक हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. बुद्धी, सौभाग्य आणि समृद्धीची देवता भगवान गणेशाचा जन्म या दिवशी साजरा केला जातो.

हा सण (ganpati sthapana muhurat 2024 ) दरवर्षी भाद्रपद महिन्यात साजरा केला जातो, जो दहा दिवस चालतो.   त्याचबरोबर गणेश मूर्ती विसर्जनाने त्याचा समारोप केला जातो, त्यामुळे त्याची सुरुवात होण्यापूर्वी संपूर्ण माहिती जाणून घेणे महत्वाचे आहे.

गणेश महोत्सव कधी सुरू होणार? (गणेश स्थापना सकाळ मुहूर्त २०२४)

वैदिक पंचांगानुसार यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी 6  सप्टेंबर  रोजी दुपारी 3 वाजून 1  मिनिटांनी सुरू होईल.  तर हे मुहूर्तः 7 सप्टेंबर रोजी  संध्याकाळी 5 वाजून 37 मिनिटांनी संपणार  आहे.

उदयतिथीच्या पार्श्वभूमीवर वार  शनिवार, ७ सप्टेंबर पासून गणेश चतुर्थीला सुरुवात होणार असून या दिवशी गणेशमूर्तीची स्थापना आणि व्रताला सुरुवात होणार आहे.

   तसेच 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीची (गणेश पूजा मुहूर्त 2024)  पूजा सकाळी 11.03 ते दुपारी 1.34   या वेळेत असेल.

गणेश चतुर्थी कधी संपणार?

पंचांगाचा विचार केल्यास  गणेश चतुर्थी मंगळवार, १७ सप्टेंबर २०२४  रोजी अनंत चतुर्दशीला संपणार आहे.

त्याच दिवशी गणपती विसर्जन करण्यात येणार आहे. असे मानले जाते की जे लोक हे व्रत  करतात त्यांना भगवान गणेशाचा पूर्ण आशीर्वाद मिळतो. तसेच त्यांच्या कुटुंबात आनंदाचे दिवस पाहायला मिळतात.

2 thoughts on “ganpati sthapana muhurat 2024”

Leave a Comment