मस्साजोग सरपंच (Santosh deshmukh)हत्या प्रकरण: अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी तालुकाध्यक्षाला अटक

मस्साजोग सरपंच (Santosh deshmukh)हत्या प्रकरण: अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी तालुकाध्यक्षाला अटक

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे माजी सरपंच संतोष देशमुख (Santosh deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी बीड पोलिसांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याला अटक केली आहे. चाटे याला छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे येत असताना लक्ष्मी चौकात स्थानिक गुन्हे शाखेने पाठलाग करून ताब्यात घेतले.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या हत्येप्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असून, अजून तीन आरोपी फरार आहेत. संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.

Santosh deshmukh


चाटे याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप आहे. याशिवाय पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे.


या प्रकरणात जयराम चाटे (२१) आणि महेश केदार (२१) या दोघांना केजजवळील तांबवा शिवारातून अटक करण्यात आली होती. यानंतर आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली होती. आता चौथा आरोपी चाटे याला अटक करण्यात आली आहे.


संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक व्हिडीओ समोर आला असून, यात पोलिस निरीक्षक राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले, आणि धनंजय देशमुख यांच्या भेटीचे दृश्य आहे. यामुळे प्रकरण आणखी गडद झाले आहे.

आता उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत.

Leave a Comment