chagan bujbal : छगन भूजबळ यांना मंत्री मंडळातून वगळण्याची ही आहेत कारणे.

chagan bujbal : छगन भूजबळ यांना मंत्री मंडळातून वगळण्याची ही आहेत कारणे.

1. मंत्रिमंडळातून छगन भुजबळ (chagan bujbal) बाहेर

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ chagan bujbal यांना स्थान न दिल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी निराशा पसरली आहे. ज्येष्ठ नेते आणि ओबीसी समाजाचे प्रख्यात नेतृत्व असूनही त्यांना वगळल्याची चर्चा आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
chagan bujbal

2. मराठा आरक्षणावरून पक्षाची अडचण

भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनावर घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पक्ष अडचणीत आला होता. मनोज जरांगे आणि भुजबळ यांच्यातील संघर्षामुळे राजकीय वातावरण तापले, ज्याचा प्रभाव लोकसभा निवडणुकीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

3. मुलाला संधी, पुतण्याची बंडखोरी

भुजबळ यांच्या मुलगा पंकज भुजबळ यांना विधान परिषदेत संधी मिळाल्यानंतर त्यांच्या पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगावमध्ये बंडखोरी केली. या बंडखोरीत भुजबळ यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

4. महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा मुद्दा

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळ निर्दोष ठरले होते. मात्र, शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचा आरोप केला. या प्रकरणामुळेही त्यांची प्रतिमा डागाळल्याचे मानले जाते.

5. मराठा समाजाला संदेश देण्यासाठी ॲड. माणिक कोकाटे यांना संधी

छगन भुजबळ यांना वगळून मराठा समाजातील सिन्नरचे आमदार ॲड. माणिक कोकाटे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. यामागे मराठा समाजाला संदेश देण्याचा अजित पवारांचा हेतू असल्याचे मानले जाते.

6. chagan bujbal छगन भुजबळांची प्रतिक्रिया

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याबाबत विचारले असता भुजबळ यांनी त्यांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या विषयावर नंतर प्रतिक्रिया देण्याचे स्पष्ट केले.

7. समर्थकांची नाराजी आणि पुढील मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता

भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. मात्र, पुढील मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment