Realme P3 Pro 5G: आजपासूनबाजारात विक्रीसाठी उपलब्ध ; पहा किंमत, ऑफर्स आणि फोन ची वैशिष्ट्ये

Realme P3 Pro 5G ; Realme कंपनी ने आपला अजून एक नवीन स्मार्टफोन Realme P3 Pro 5G आज, २५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजता विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे.

हा फोन फ्लिपकार्ट, Realme च्या अधिकृत वेबसाइट आणि रिटेल स्टोअर्सवरून देखील ग्राहकांना खरेदी करता येईल. या नवीन स्मार्टफोनमध्ये अत्याधुनिक फीचर्स आणि आकर्षक ऑफर्स देखील उपलब्ध करून दिल्या आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Realme P3 Pro 5G

Realme P3 Pro 5G  किंमत आणि ऑफर्स

Realme P3 Pro 5G तीन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध करण्यात आला आहे:

  • 8GB + 128GB: ₹ 23,999
  • 8GB + 256GB: ₹ 24,999
  • 12GB + 256GB: ₹ 26,999

लाँच ऑफर अंतर्गत, सर्व व्हेरिएंट्सवर ₹ 2,000 चा बँक डिस्काउंट उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे, या ऑफरनंतर किंमती अनुक्रमे 8GB + 128GB  ₹ 21,999, 8GB + 256GB:  ₹ 22,999 आणि 12GB + 256GB  ₹ 24,999 इतक्या होतील. याशिवाय, ६ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट (बिनव्याजी) EMI चा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Realme P3 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स वैशिष्ट

  • डिस्प्ले: 6.83-इंच क्वाड-कर्व्ड AMOLED पॅनेल, 120Hz रिफ्रेश रेट, 2800×1272 पिक्सेल रिझोल्यूशन, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 600 निट्स कमाल ब्राइटनेस.
  • प्रोसेसर: Qualcomm Snapdragon 7s Gen 3 5G चिपसेट, Adreno 810 GPU सह उपलब्ध असणार आहे.
  • रॅम आणि स्टोरेज: 8GB/12GB LPDDR4X रॅम आणि 128GB/256GB UFS 3.1 इंटरनल स्टोरेज देण्यात येत आहे.
Realme P3 Pro 5G
  • कॅमेरा विशेष:
    • रियर (पाठीमागचा): 50MP Sony IMX896 प्रायमरी सेन्सर (OIS सपोर्ट) आणि 2MP डेप्थ लेन्स.
    • फ्रंट (पुढचा): 16MP सेल्फी कॅमेरा. सेल्फी साठी अत्यंत गुणवत्ता पूर्वक कॅमेरा.
  • बॅटरी: 6000 mAh क्षमतेची बॅटरी, 80 W फास्ट चार्जिंग सपोर्ट.
  • ऑपरेटिंग सिस्टम: Android 15 वर आधारित Realme UI 6.0
  • इतर फीचर्स: IP69/IP68/IP66 रेटिंग, अंडरवॉटर मोड, AI Eraser 2.0 सपोर्ट, ड्युअल सिम स्लॉट, ऑडिओ जॅक, Wi-Fi, GPS, Bluetooth, USB Type-C पोर्ट.

निष्कर्ष

Realme P3 Pro 5G हा अत्याधुनिक फीचर्स आणि आकर्षक ऑफर्ससह बाजारात उपलब्ध झाला आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा फोन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. आजच फ्लिपकार्ट, Realme च्या अधिकृत वेबसाइट किंवा जवळच्या रिटेल स्टोअरवर भेट देऊन या फोनची खरेदी करा आणि नवीन तंत्रज्ञानाचा आनंद घ्या.

बँकेने ओढून आणलेल्या गाड्या खरेदी कश्या करता येतात ?

Leave a Comment