namo shetkari yojana 6th installment date : महाराष्ट्र राज्य शासनाने केंद्र शासनाच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना च्या धर्तीवर राज्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजना राबवण्याचा निर्णय घेतला. या योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये एवढी आर्थिक मदत वितरित केली जाते. नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी पी एम किसान योजनेचे 6000 हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6000 हजार रुपये असे मिळून वर्षाला 12000 हजार रुपये एवढा निधी वितरित केला जातो.

नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत पाच हप्त्यांचे यशस्वीरित्या वितरण करण्यात आलेले आहे. मागील वेळी पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 05 वा हप्ता एका दिवशी वितरित करण्यात आला होता. परंतु आता 24 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्र सरकारने पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता वितरित केला आहे; परंतु राज्य शासनाने अद्याप पर्यंत नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता वितरित करण्याची कोणतीही प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लागलेली आहे.
पी एम किसानचा 19 हप्ता जमा
देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बिहार येथील एका कार्यक्रमांतर्गत देशातील पात्र असणाऱ्या पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांना 2000 हजार रुपये प्रति शेतकरी या प्रमाणात निधी वितरित करण्यात आलेला आहे. पी एम किसान च्या 19 व्या हप्ता सोबतच नमो शेतकरी चा सहावा हप्ता वितरित केला जाईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांच्या मनात होती. परंतु राज्य शासनाने नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता वितरित करण्याबाबतची कोणतीही प्रक्रिया राबवली नसल्यामुळे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही.
नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढणार
(namo shetkari yojana 6th installment date) नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याची प्रतीक्षा लागलेली असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना हप्त्यामध्ये वाढ करणार असल्याची माहिती दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना आता वर्षाला 15000 रुपये एवढे अर्थसहाय्य वितरित केले जाणार आहे.
नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवून शेतकऱ्यांना आता वर्षाला 6000 हजार ऐवजी 9000 रुपये एवढा निधी वितरित करणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नमो शेतकरी योजनेचे 9000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 6000 रुपये असे मिळवून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 15000 रुपये एवढे अर्थसहाय्य वितरित केले जाणार असल्याची माहिती दिली.
हे वाचा: जमिनीची मोजणी आता एक तासात.
कधी मिळेल नमो शेतकरी योजनेचा हप्ता namo shetkari yojana 6th installment date
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना हप्ता वाढवून दिला जाणार आहे. हप्ता वाढवून देण्यासाठी राज्य शासनाला येत्या अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद करावी लागेल. येत्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजेच 10 मार्च रोजी शेतकरी सन्मान निधी योजनेचा निधी वाढवण्याची घोषणा केली जाईल. अर्थसंकल्पात घोषणा करून मंजुरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना हप्त्याचे वितरण करण्याची प्रक्रिया राबवली जाईल.
सद्यस्थितीमध्ये तरी नमो शेतकरी योजनेची (namo shetkari yojana 6th installment date) निश्चित तारीख सांगणे शक्य नाही. राज्य शासन ज्यावेळी अर्थसंकल्पामध्ये वाढीव हप्त्याची घोषणा करेल त्यानंतर या योजनेची परत अंमलबजावणी आणि निधी मंजुरी ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर शेतकऱ्यांना पुढील आठ दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता वितरित केला जाईल. namo shetkari yojana 6th installment date
नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवणार; पहा काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकार कडून अद्याप पर्यन्त कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी आधी रक्कम मंजूर करेल व रक्कम मंजूर झाल्यानंतर आपल्याला हप्ता वितरित केला जाणार आहे.
1 thought on “namo shetkari yojana 6th installment date या दिवशी मिळणार नमो शेतकरी योजनेचा 6 वा हप्ता.”