देशात Pm vishwkarma: शिलाई मशीन योजना बंद. विश्वकर्मा योजना राबविण्यात आली या विश्वकर्मा योजनेअंतर्गत देशातील असंघटित कामगारांना प्रशिक्षण आणि साहित्य खरेदीसाठी तसेच व्यवसाय वाढीसाठी आर्थिक सहाय्य करण्याचा शासनाने उद्देश ठेवला परंतु या योजनेअंतर्गत बहुतांश महिलांनी शिलाई मशीन करिता अर्ज केल्यामुळे आता यामध्ये शिलाई मशीन आणि गवंडी म्हणजेच बांधकाम कामगार या दोन घटकासाठी प्रशासनाकडून स्थगिती देण्यात येत आहे. त्याबद्दलचे प्रसिद्धी पत्र देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे आता शिलाई मशीन किंवा बांधकाम कामगार योजना अंतर्गत ज्या अर्जदारांना विश्वकर्मा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे त्यांना आता नव्याने अर्ज करता येणार नाही.
Pm vishwkarma: शिलाई मशीन योजना बंद परीपत्रकामध्ये काय सूचना देण्यात आल्या
दिनांक 09/06/2024 रोजी अहमदपूर पंचायत समिती मार्फत एक परिपत्रक जारी करण्यात आलं या परिपत्रकामध्ये पीएम विश्वकर्मा अंतर्गत शिलाई मशीन व गवंडी यांची नोंद न करणे बाबतचा विषय मांडण्यात आला यामध्ये बहुतांश महिला विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन व गवंडी कामगार यासाठी अर्ज करत आहे यामध्ये एका गावातून दोनशे ते पाचशे अर्ज सादर केले आहे. त्यामुळे एवढे टेलर आणि बांधकाम कामगार एका गावात आहेत का याची तपासणी करा किंवा नवीन अर्ज करणे बंद करा याबाबतच्या सूचना सीएससी केंद्र चालक महा-ई-सेवा केंद्र चालक यांना देण्यात आले आहेत.