Neet UG 2024 वेळापत्रकात बदल 5 सप्टेंबर पर्यंत करता येणार कागदपत्र तपासणी

By md news

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने MBBSआणि BDS प्रवेशासाठी महाराष्ट्र नीट यूजी समुपदेशन 2024 पहिल्या राउंड  मधील जागा वाटप निकालाचे सुधारित वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. उमेदवार अद्ययावत वेळापत्रक अधिकृत वेबसाइट, Neet UG

2024 medical2024.mahacet.org वर सुद्धा पाहू शकतात.

Neet UG 2024

सुरुवातीला उमेदवारांना २७ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत मध्ये  आपले पर्याय सादर करण्याची मुदत देण्यात आली होती, तर जागा वाटपाचा निकाल ३० ऑगस्ट रोजी लागणार होता. तथापि, नवीन वेळापत्रकानुसार, उमेदवारांनी 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर दरम्यान संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आणि आवश्यक कागदपत्रे आणि शुल्कासह त्यांचे स्टेटस रिटेंशन फॉर्म सादर करणे आवश्यक आहे.

Neet UG 2024  नवीन वेळापत्रक असे तपासा

1: उमेदवारांनी अधिकृत राज्य सीईटी वेबसाइटला भेट द्यावी – medical2024.mahacet.org

2: होमपेजवर दिसणाऱ्या “सुधारित वेळापत्रक लिंक” वर क्लिक करा.

३: लिंकवर क्लिक केल्यानंतर पीडीएफ आपोआप डाऊनलोड होईल.

४: भविष्यातील संदर्भासाठी त्याचा स्क्रीनशॉट किंवा प्रिंटआऊट आपल्याकडे काढून घ्या.

1 thought on “Neet UG 2024 वेळापत्रकात बदल 5 सप्टेंबर पर्यंत करता येणार कागदपत्र तपासणी”

Leave a Comment