Marathwada rain update मागील दोन दिवसापासून राज्यात जोरदार पाऊस पडत आहे या पावसामुळे मराठवाड्यासह विदर्भात सुद्धा पूरस्थिती निर्माण झाली आहे.
तर हवामान विभागाने आज म्हणजे 2 सप्टेंबर आणि उद्या म्हणजे 3 सप्टेंबर या दिवशी राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे तर दोन दिवसानंतर पावसाचा जोर कमी होईल असेही सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाने राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला होता त्याप्रमाणे राज्यात सर्वत्र जोमदार पाऊस झाला मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिकच आहे. त्यामध्ये परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार प्रकारचा पाऊस पडला.
त्यामध्ये हवामान खात्याने जाहीर केला तर छत्रपती संभाजीनगर जालना व बीड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला त्यासोबतच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे.
marathwada rain update कोठे काय नुकसान झाले
मराठवाड्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने खूपच कहर केला आहे या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील 420 महसूल मंडळापैकी 240 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली आहे मराठवाड्यात पावसाने कहर केला असून अर्ध्या मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात आली. यामध्ये लातूर जिल्ह्यात एक व्यक्ती पुरात वाहून गेल्याचे सांगण्यात आलंय

मराठवाड्यात पावसाने केला 24 तासात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे तर लातूरमध्ये एक जण पुरात वाहून गेला आहे मराठवाड्यामध्ये एकूण 78 जनावरे दगावल्याची नोंद करण्यात आली आहे हिंगोली आणि बीड जिल्ह्यात दोन जण दगावले आहेत तर लातूरमध्ये एक जण वाहून गेलाय 106 कच्च्या घरांची पडझड झाल्याचे सांगण्यात आलं
मराठवाड्यात जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे नुकसान झाले आहे या नुकसानीचे पंचनामा करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत
Marathwada rain update मराठवाड्यातील अतिवृष्टीची नोंद झालेले जिल्हे
छत्रपती संभाजी नगर मध्ये 47 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली
जालना मध्ये 29 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली
बीडमध्ये साठ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली
लातूर मध्ये 31 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली
धाराशिव मध्ये 11 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली
नांदेड जिल्ह्यात 42 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली
परभणी मध्ये पन्नास मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली
हिंगोली जिल्ह्यात 15 मंडळात आदिवासीची नोंद करण्यात आली
Marathwada rain update या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आला
हवामान खात्याकडून जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे तसेच छत्रपती संभाजी नगर रेड अलर्ट म्हणून घोषित करण्यात आले आहे.
यावेळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाट आणि पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे सरासरी वाऱ्याचा वेग 30 ते 40 प्रति तास राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते.
1 thought on “marathwada rain update : मराठवाड्यात पावसाचा कहर 240 मंडळात अतिवृष्टिची नोंद.”