ladki bahin yojana : लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी मार्च महिन्याचा हप्ता जमा, तुम्हाला मिळाला का ?

ladki bahin yojana राज्य सरकार ने राज्यातील लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या पूर्व संध्येला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्याची माहिती दिली होती. या नुसारच राज्य सरकार ने प्रक्रिया राबवत महिलांना 7 मार्च रोजी फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू केले. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरण प्रक्रिया पूर्ण करून राज्य सरकार आता मार्च महिन्याचा हप्ता देखील वितरित करत आहे.

ladki bahin yojana

दिनांक 12 मार्च पासून महिलांच्या बँक खात्यावर मार्च महिन्याचा हप्ता जमा करण्यास सुरवात करण्यात आलेली आहे. येत्या दोन दिवसात राज्यातील 2 कोटी पात्र महिलांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यास सुरू करण्यात आले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

तुम्हाला हप्ता मिळाला का? ladki bahin yojana

राज्यातील ladki bahin yojana पात्र असणाऱ्या महिलांना हप्ता वितरण प्रक्रिया सुरू असून आपण आपल्या बँक खात्याचा तपशील पाहून आपल्याला हप्ता मिळाला किंवा नाही याची माहिती घेऊ शकता. हप्ता वितरण प्रक्रिया सुरू असून येत्या दोन दिवसात सर्व महिलांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे. पात्र असून देखील अजून हप्ता जमा झाला नसेल तर आपण पुढील 2 ते 3 दिवस वाट पहावी. ज्यांना हप्ता मिळाला नाही त्यांना पूढील 2 -3 दिवसात हप्ता जमा होईल.

अपात्र ठरलेल्या महिलांना हप्त्याचे वितरण नाहीच

सरकार कडून लाडक्या बहिणीच्या अर्जाची तपासणी करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. अर्ज तपासणी प्रक्रिया दरम्यान राज्यातील 9 लाख महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आले आहे. ज्या महिलांना योजनेतून अपात्र करण्यात आले आहे त्या महिलांना या महिन्याचा तसेच पुढील लाभ देखील वितरित केला जाणार नाही. ज्या महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाही त्या महिलांनी आपण योजनेत पात्र आहोत का याची एकदा खात्री करून घ्यावी. येथे पहा कोण पात्र आणि कोण अपात्र.

पुढील सुरळीत मिळत राहणार

राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी 36000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 36000 कोटी रुपयांची केलेली तरतूद राज्यातील पात्र महिलांना पुढील वर्ष भर लाभ देण्यासाठी पुरेशी असून पुढील हप्ते महिलांना वेळेवर मिळत राहतील अशी माहिती देखील विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

ladki bahin yojana अर्थसंकल्पातील तरतुदी नुसार लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना पुढील लाभ सुरळीत वितरित केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेतून प्रत्येक महिन्याला लाभार्थी महिलांची संख्या कमी होणार आहे. ज्या महिलांना 65 वर्ष पूर्ण होतील त्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. योनेतील वय 65 वर्ष च्या अटीवर प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण योजनेतील महिलांची संख्या कमी होत राहणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

पहा राज्यातील लाडक्या बहिणीना मागील 7 महिन्यात किती मिळाला लाभ

Leave a Comment