beer bar licence maharashtra अनेक तरुणांचे व्यवसाय करणे हे स्वप्न असते. दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करणे अधिक चांगले वाटते. कारण व्यवसायात आपल्याला कोणाच्याही दबावाशिवाय आपल्या मर्जी प्रमाणे काम करण्याचे मुभा मिळते. व्यवसाय करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या मोठ्या विचरांचा समावेश होतो. काही व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक गुंतवणूक रक्कम ही कमी स्वरूपात असते तर काही व्यवसायांसाठी करण्यासाठी मोठी रक्कम गुंतवणूक करावी लागते, असाच एक व्यवसाय म्हणजे बियर बार व्यवसाय.

बऱ्याच वेळा आपल्या नजरेत आपल्या भागातील बियर बार येत असतात. बियर बार समोरील गर्दी आणि ग्राहकांची ओढ पाहून आपण पण असा काही तरी व्यवसाय करावा हा विचार आपल्या मनात नेहमी येत असतो. विचार आला की व्यवसाय सुरू करता येत असता तर आज प्रत्येक जन एक व्यवसायिक असता. नवीन व्यवसाय सुरू करायचं ठरवलं की आधी त्या व्यवसाय साठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे कागदपत्रे जागा आणि पूर्ण नियोजन आवश्यकच असते. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण बियर बार व्यवसाय करण्यासाठी आवश्यक परवाना आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी इतर आवश्यक बाबी या बद्दल ची सर्व माहीत पाहणार आहोत. beer bar licence maharashtra
बियर बार लायसन्स महाराष्ट्र बियर बार व्यवसायात गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर असते. या व्यवसायात गुंतवणूक मोठी असली तरी व्यवसायातून मिळणारा नफा देखील खूप चांगला असतो. यामुळेच अनेक नवीन आणि जुन्या व्यवसायिकांचे बियर बार टाकणे हे एक स्वप्न असतेच. बियर बार व्यवसाय मध्ये ग्राहकांची कमी नसल्यामुळे अनेक व्यवसायधारक या व्यवसायाकडे वळत आहेत.
बियर बार व्यवसायमद्धे अनेक प्रतिस्पर्धी असले तरी देखील या व्यवसायतील ग्राहक वर्ग कमी हॉट नाही. ग्राहक मोठ्या प्रमाणावर असल्याने व्यवसाय देखील लवकरच चांगल्या प्रकारे चालतो. आज आपण या बियर बार व्यवसाय बद्दलची सर्व माहीत घेत आहोत. परवाना,आवश्यक कागदपत्रे, व्यवसायातून मिळणारा नफा आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी गुंतवणूक याच सर्व माहिती घेण्यासाठी लेख शेवट पर्यन्त वाचा. कारण हा असा व्यवसाय आहे ज्या मध्ये प्रत्येक व्यवसाय धारक यशस्वी झालेलाच पाहायला मिळतो. beer bar licence maharashtra

बिअर बार व्यवसायातील महत्त्वाच्या संधी
बियर बार या व्यवसायाचा ट्रेंड सध्या खूपच जास्त मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. उच्चभ्रू नगरिकांच्या मोठ मोठ्या पार्ट्यां देखील या बियर बार मध्येच होतात. एखादा खास दिवस साजरा करण्यासाठी तसेच काही कार्यक्रम करण्यासाठी सध्याच्या नगिरकांना बारमध्ये जायला खूपच आवडते. बियर बार व्यवसाय मध्ये जाण्याचे आणि व्यवसाय करण्याचे हेच तर मुख्य आकर्षण व्यवसाय धारकांना दिसत आहे. beer bar licence maharashtra
बार व्यवसाय करण्यासाठी किती रक्कम लागते?
अनेकांना तरुणांना आणि व्यवसायिकांना बार व्यवसाय करण्याची खूप इच्छा आहे. त्याचे कारण देखील तसेच आहे बार हा व्यवसायिकांना 50 टक्के नक्कीच नफा देणारा व्यवसाय मानला जात आहे. परंतु सुरवातीला लागणाऱ्या गुंतवणीकाला विसरुन चालणार नाहीच. नवीन बियर बार व्यवसाय सुरु करण्यासाठी कमीत कमी 16 ते 20 लाख रुपये भांडवलाची गरज असतेच. 16 ते 20 लाख रुपये एवढे भांडवल असेल तरच तुम्ही नवीन बियर बार हा व्यवसाय सुरु करु शकता. भांडवल उपलब्ध नसेल तर या व्यवसायाचा विचार करणे देखील अवघडच आहे.
कोणत्या ठिकाणी बार चा व्यवसाय करता येत नाही.
भारत देशात अशी काही विशेष राज्ये आहेत जेथे कायद्या अंतर्गत दारुबंदी लागू करण्यात आलेली आहे. यामुळे बियर बार व्यवसाय तुम्ही अशाच जाग्यावर करु शकता ज्याठिकाणी सरकारने अल्कोहोल किंवा तत्सम सॉफ्ट ड्रिंक पिण्यास मान्यता दिलेली असेल. भारत देशात गुजरात आणि बिहार या राज्यांमध्ये शासनामार्फत दारूबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये देखील शासनातर्फे दारूबंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे. आपण ज्या जाग्यावर नव्याने व्यवसाय करू करणार आहेत त्या जाग्यावर दारू बंदी आहे का हे पाहणे देखील आपल्यासाठी महत्वाचे असणार आहे. beer bar licence maharashtra
बियर बार साठी परवाना आवश्यकच असतो
नव्याने बियर बार हा व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे बियर बार चावण्याचा लायसन्स म्हणजेच परवाना असणे अत्यंत आवश्यक आहे. वैध परवान्या शिवाय तुम्ही अल्कोहोल युक्त पेय तर विकू शकत नाही. जर आपण तसे केले तर तो एक अपराधच मानला जातो. त्यामुळे तुम्हाला बियर बार व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक असणारा परवाना मिळवणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या एक्साईज विभागाकडे अर्ज करून हा बियरबार परवाना देखील मिळवता येतो. परवाना मिळवाण्यसाठी आपणास अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करताना अर्जा सोबत आवश्यक असणारी सर्व कादंडपत्रे जोडणे देखील महत्वाचे आहे. बियर बार लायसन्स महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यात बियर बार परवाना मिळवण्याची प्रक्रिया
- बियर बार परवाना म्हणजेच बियर बारचे लायसन्स मिळवणीसाठी excise department म्हणजेच राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
- सर्वप्रथम तुम्हाला आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या Excise ऑफिसमध्ये जावे लागेल.
- त्या ऑफिसमध्ये बियर बार व्यवसाय परवान्यासाठी असणारा अर्ज अगदी मोफत मिळतो, तो घ्यावा लागेल. अर्जा मध्ये विचारलेली सर्व माहिती काळजी पूर्वक भरणे गरजेचे आहे.
- अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आणि एक कोर्ट स्टँप लावून अर्ज पूर्ण करा.
- सोबत तुम्हाला काही आवश्यक असणारी कागदपत्रे देखील जोडावी लागतील,
- आधार कार्ड आणि पॅन कार्ड ची झेरॉक्स
- रेशन कार्डची झेरॉक्स
- मागील तीन वर्षांचा ITR रिपोर्ट
- या सर्व कागदपत्रांसह तुम्ही भरलेला अर्ज तुमच्या जिल्हा पातळीवरील Excise ऑफिसमध्ये सबमीट करा. अर्जाची तपासणी करुन तुम्हाला कार्यालयातून परवान्यासंबंधी फोन केला जाईल. बियर बार लायसन्स महाराष्ट्र
बियर बार व्यवसायासाठी इतर महत्वाच्या गोष्टी
बियर बार लायसन्स महाराष्ट्र बियर बार लायसन्स महाराष्ट्र राज्यात बियर बार व्यवसाय करताना काही महत्वाच्या गोष्टींची आणि साधनांची अत्यंत आवश्यकता असते, त्या नेमक्या कोणत्या गोष्टी ते आपण जाणून घेऊ. राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत खालील गोष्टींची तपासणी केल्या नंतरच तुम्हाला बियर बार परवाना वितरित केला जातो.
- ज्या जागेवर बिअर बार व्यवसाय सुरू करायचा आहे तेथे 800 ते 1000 स्क्वेअर फुट जागा आवश्यक असते.
- बियर बारमध्ये आवश्यक असणाऱ्या मशीन्स खरेदी कराव्या लागतात.
- तुमच्या व्यवसायासाठीचा जीएसटी क्रमांक तयार करून घ्यावा लागेल.
- मॅनेजर पासून वेटर पर्यंत इत्यादी कामांसाठी तुम्हाला कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते.
- बियर थंड असते त्यामुळे मोठ मोठे रेफ्रिजरेटर तुम्ही खरेदी करणे देखील गरजेचे असते.beer bar licence maharashtra

हे वाचा : बँकेने ओढून आणलेल्या गाड्या खरेदी कश्या करता येतात ?
बियर बार लायसन्स महाराष्ट्र साठी लागणारे कागदपत्रे
१) अर्जदारांचे छायाचित्र व स्वाक्षरी
२) अर्जदारांचा ओळखीचा पुरावा (खालील पैकी कोणताही एक)
- आधार कार्ड
- पासपोर्ट
- मतदार कार्ड
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
३) अर्जदारांचा पत्ता पुरावा (खालील पैकी कोणताही एक)
- आधार कार्ड
- पासपोर्ट
- मतदार ओळखपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
४) अस्तित्वाचा प्रकार (कोणताही एक):-
- जर मालकी/मालकी असेल तर
- जर भागीदारी/एलएलपी फर्म असेल तर
- जर कंपनी (लिमिटेड किंवा सार्वजनिक)
- जर सहकारी किंवा सार्वजनिक कंपनी असेल तर
जर भागीदारी/एलएलपी फर्म असेल तर
- नोंदणीकृत भागीदारी करार किंवा एलएलपी कागदपत्रे
जर कंपनी (लिमिटेड किंवा सार्वजनिक)
- धर्मादाय आयुक्तांकडून नोंदणी प्रमाणपत्र (अनिवार्य)
- सर्व संचालकांचे फॉर्म ३२
- संचालक मंडळाचा ठराव (अनिवार्य)
- लेखांचे निवेदन, लेखांचे संघटन
जर सहकारी किंवा सार्वजनिक कंपनी असेल तर
- सहकारी विभाग/कंपनी रजिस्ट्रारकडून कंपनीच्या नोंदणीचे प्रमाणपत्र (अनिवार्य)
- कार्यकारी संचालकांच्या नियुक्तीबाबत आणि या व्यापाराच्या परवानगीसाठी संचालक मंडळाचा ठराव (अनिवार्य)
- सहकारी संस्थेच्या बाबतीत- उपविधी/नोंदणी प्रमाणपत्र आणि ठरावाची प्रत
५) सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट / बँक गॅरंटी – परवाना शुल्काच्या ५०%.
परिसर तपशील
ठिकाण किंवा मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे (कोणताही एक अ किंवा ब)
- मालकीचे कागदपत्रे
- भाडेपट्टा करारावर
अ) मालकीचा दस्तऐवज (कोणताही एक)
- मालमत्तेचा ७/१२
- संबंधित ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्रॉपर्टी कार्ड.
- झोपडपट्टी क्षेत्राच्या बाबतीत फोटो पास
ब) जर भाडेपट्टा करारावर असेल (दस्तऐवज अ, ब, क पैकी कोणतेही एक)
- अ) मालमत्तेचा ७/१२
- ब) स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्रॉपर्टी कार्ड जेथे संबंधित असेल तेथे
- क) झोपडपट्टी क्षेत्राच्या बाबतीत फोटो पास
- ड) मालकाच्या मालमत्तेत दारू व्यवसाय करण्यासाठी त्याची ना हरकत प्रमाणपत्र (NOC)
- ई) भाडेपट्टा करार/भाडे कराराची नोंदणीकृत प्रत
क) सक्षम अधिकाऱ्याचे पूर्णत्व किंवा भोगवटा प्रमाणपत्र.
ड) प्रस्तावित जागेचा आराखडा ज्यामध्ये खालील तपशील आहेत.
- प्रस्तावित परवाना परिसराचा तपशीलवार आराखडा
- स्थान / जागेची योजना
- प्रस्तावित परवाना परिसराच्या सीमा (उत्तर दक्षिण. पूर्व, पश्चिम)
- क्षेत्र वेळापत्रक
- अर्जदार ज्या परवान्याअंतर्गत व्यवसाय करू इच्छितो तो परवाना प्रकार आणि व्यापार नाव.
- प्रस्तावित परवाना जागेचा तपशीलवार पत्ता
- उत्तर दिशा
इ) ग्रामसभा/नगर पालिका/नगर पंचायत/नगर परिषदेची एनओसी
- क्लबचे नोंदणी प्रमाणपत्र
- सक्षम प्राधिकाऱ्याचे पूर्णत्व किंवा भोगवटा प्रमाणपत्र.
- प्रस्तावित जागेचा आराखडा
- कार्यक्षेत्रात (ग्रामसभा, नगर पालिका, नगर पंचायतींनी त्यांच्या ठरावाद्वारे तयार केलेले ना हरकत प्रमाणपत्र)
2 thoughts on “beer bar licence maharashtra : बियर बार लायसन्स महाराष्ट्र कसे मिळवावे कागदपत्रे कोणती लागतात अर्ज कसा करावा जाणून घ्या सविस्तर माहिती.”