ladaki bahin yojana update लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाही तर करा हे काम.

ladaki bahin yojana update राज्य सरकारकडून राज्यातील अर्ज केलेल्या लाडक्या बहिणींची मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यात आली. या अर्ज तपासणी दरम्यान अपात्र असणाऱ्या महिलांना या योजने मधून वगळण्यात आले. यामध्ये राज्यातील जवळपास 9 लाख पेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले असून त्यांना फेब्रुवारी महिन्याचा लाभ वितरित करण्यापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. आता या महिलांना योजनेतून वगळण्याचे कारण काय, तसेच ज्या महिलांना योजनेमधून वगळले आहे त्यांना पुढील तक्रार करता येते का? किंवा पात्र असताना देखील आपल्याला या योजनेमधून वगळले असेल तर आपण तक्रार कोठे करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.

ladaki bahin yojana update

लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्या महिला पात्र आहेत ladaki bahin yojana update

ladaki bahin yojana update राज्य शासनाने लाडकी बहीण योजना सुरू करतेवेळी योजनेच्या पात्रता व अपात्रतेच्या नियम व अटी शासन निर्णयाच्या माध्यमातून निर्गमित केल्या होत्या. या सर्व नियम व अटीच्या माध्यमातून ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना लाभ चालू ठेवण्यात आलेला आहे; परंतु ज्या महिलांनी अपात्र असताना देखील अर्ज सादर केले होते अशा महिलांची छाननी करून आता त्या महिलांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात येत आहे. अपात्र असणाऱ्या महिलांना या योजनेमधून पूर्णतः वगळण्यात आलेले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा: लेक लाडकी योजना फॉर्म मराठी अर्ज PDF पात्रता, कागदपत्रे.

अर्जाची छाननी करताना अपात्र असणाऱ्या महिलांना योजनेतून कायम स्वरूपी वगळण्यात आले आहे. अपात्र असणाऱ्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील वितरित केला नाही. फेब्रुवारी महिन्या सोबतच पुढील लाभ देखील या महिलांना वितरित केला जाणार नसल्याची स्पष्टता सरकार कडून देण्यात आली आहे.

अर्जाची छाननी दरम्यान फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरण करण्यास विलंब झाला तर महिलांना पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून महिलांना ,1500 का 3000 रुपये ? मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. ladaki bahin yojana update

लाडकी बहीण योजना पात्रता

  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची कायम स्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे
  • राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला योजनेसाठी पात्र असेल.
  • किमान वयाचे 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ वितरित केला जाईल.
  • लाभार्थ्याचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त नसावे.

लाडकी बहीण योजना अपात्रता

  • ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरणारा व्यक्ती आहे
  • यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमार्फत कार्यरत आहेत तसेच सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत अशा कुटुंबातील सदस्य देखील या योजनेतून अपात्र ठरविण्यात येत आहे.
  • लाभार्थी महिला इतर कोणत्याही शासकीय योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत असेल तर त्यामुळे देखील या ठिकाणी आपण ठरवण्यात येते.
  • त्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान खासदार आमदार आहेत अशा कुटुंबातील अर्जदार महिलांना देखील या योजनेतून व गाळण्यात येत आहे.
  • त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य असतील अशा महिलांना देखील या योजनेमधून वगळण्यात येते.
  • ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना या योजनेअंतर्गत वगळण्यात आले आहे.

पात्र असून देखील हप्ता मिळाला नाही

ladaki bahin yojana update बहुतांश महिलांना वरील नियम व अटीच्या अधीन राहून देखील अर्जदार महिला पात्र असताना देखील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला नाही. अशा महिलांनी काय करावे याबाबत बऱ्याच महिलांचे मनात संभ्रम निर्माण आहेत. कारण सर्व बाबींनी पात्र असून देखील महिलांना या योजने मधून वगळण्यात आले आहे. ज्या महिला अपात्रतेच्या यादीमध्ये येत असतील त्यांनी या ठिकाणी कोणतेही कार्य करण्याची आवश्यकता नाही. ज्या महिला आपत्र आहेत त्यांना शासनाकडून या योजनेतून वगळण्यात आले आहे व त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ या योजनेतून वितरित केला जाणार नाही.


लाडकी बहीण योजनेत काही महिला पात्र असताना देखील त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. बऱ्याच महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज देखील मिळाला नाही. त्या महिलांनी आपल्या बँक मध्ये जाऊन सर्वप्रथम आपल्या बँक खात्याची रक्कम तपासून पहावी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला असल्यास त्यांना काहीही करण्याची आवश्यकता नाही. ladaki bahin yojana update

परंतु पात्र असून देखील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिलेल्या हेल्पलाइन क्रमांक 181 वर कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकता. जेणेकरून शासनाच्या तपासणी यंत्रणेद्वारे नजरचुकीने आपला लाभ बंद करण्यात आलेला असू शकतो. आपण तक्रार केल्यानंतर आपल्या अर्जाची फेर तपासणी करून आपल्याला पुढील लाभ सुरळीतपणे सुरू करण्यासाठी सरकार दखल घेईल. ladaki bahin yojana update

1 thought on “ladaki bahin yojana update लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाही तर करा हे काम.”

Leave a Comment