ladki bahin yojana : महाराष्ट्र सरकारने महिलांना महिला दिनापूर्वी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्याची घोषणा केली होती. त्यानुसारच महिलांना फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे; परंतु या दरम्यान काही महिलांना रक्कम मिळालीच नाही? तर काही महिलांना रक्कम कमी स्वरूपात मिळाले आहे. याचे नेमके कारण काय आहे नेमकं कोणत्या महिलांना रक्कम मिळाली नाही व कोणत्या महिलांना रक्कम कमी मिळाली याची संपूर्ण माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.

ladki bahin yojana राज्य शासनाने आपल्या जाहीरनामांमध्ये महिलांना २१00 रुपये देणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यातील महिलांना २१00 रुपये मिळतील अशी अपेक्षा लागली होती. परंतु महिलांना 2100 रुपये न मिळता या महिलांना मिळणारे 1500 रुपये देखील कपात करण्यात आले आहेत. यातील काही महिला महिलांना 1500 ऐवजी 500 रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत.
राज्यातील महिलांना लोकप्रिय असणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर सर्वच महिलांना योजने अंतर्गत लाभ वितरित करण्यात आला होता. परंतु जानेवारी महिन्या नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची परत तपासणी करण्यात आली. या तपासणी अंतर्गत 9 लाख महिला या योजने पासून वंचित ठेवण्यात आल्या त्यासोबतच काही महिलांना रक्कम देखील कमी करण्यात आली आहे.
हे वाचा : लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा होण्यास सुरवात 1500 की 3000
इतर शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना रक्कम कमी. ladki bahin yojana
ladki bahin yojana लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र ठरण्यासाठी बाकीच्या नियम व अटी सोबतच शासनाने इतर शासकीय योजनांचा किंवा पेन्शनचा लाभ घेत नसावी. अशी देखील अट ठेवण्यात आली होती. या अटीचा उपयोग करूनच इतर शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेमध्ये उर्वरित रक्कम देण्यासंबंधीची कारवाई करण्यात आली. ज्या महिलांना इतर शासकीय योजना अंतर्गत लाभ मिळत आहे त्या महिलांना लाडकी बहीण योजने अंतर्गत मिळणाऱ्या लाभातून रक्कम कमी करून उर्वरित रक्कम लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली.
कोणत्या महिलांना मिळाले 500 रुपये
महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना ज्या महिलांना पीएम किसान योजना अंतर्गत नमो शेतकरी योजना अंतर्गत तसेच इतर कोणत्याही शासकीय योजने अंतर्गत महिन्याला पंधराशे रुपये पेक्षा कमी रक्कम मिळत असेल; तर उर्वरित रक्कम लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत वितरित केली जाईल. परंतु जर दुसऱ्या शासकीय योजनेतून मिळणारी रक्कम 1500 रुपये पेक्षा जास्त असेल तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून कोणत्याही प्रकारची रक्कम दिली जाणार नाही अशी माहिती दिली होती.
इतर शासकीय योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिला ज्यामध्ये प्रामुख्याने नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिला आणि पीएम किसान योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना रक्कम कमी स्वरूपात वितरित करण्यात येते.
नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलेला 500 रुपये महिना वितरित केला जातो. त्यासोबतच पी एम किसान योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना 500 रुपये महिना वितरित केला जातो. या महिलांना पीएम किसान व नमो शेतकरी योजने अंतर्गत या आधीच 1000 रुपये महिन्याचा लाभ वितरित केला जात आहे. त्यामुळे त्या महिलांना इथून पुढे लाडकी बहीण योजने (ladki bahin yojana)अंतर्गत मिळणारे रक्कम ही फक्त पाचशे रुपये एवढीच असेल.
ज्या महिलांना इतर शासकीय योजनेतून 1500 रुपये महिन्या पेक्षा कमी रक्कम मिळत असेल तर त्या महिलांना उर्वरित रक्कम वितरित केली जाणार आहे.
ज्या महिलांना दुसऱ्या कोणत्याही शासकीय योजनेतून रक्कम 1500 रुपये पेक्षा जास्त असेल तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून (ladki bahin yojana) कोणत्याही प्रकरचा लाभ वितरित केला जाणार नाही.
लाडकी बहीण योजनेतून या 9 लाख महिला वगळण्यात आल्या आहेत. या 9 लाख महिला योजनेतून वगळण्यात आल्या आहेत.