Bank auction car : आजकालच्या महागाईच्या काळात वाहनांच्या किमती सर्वसामान्य व्यक्तींच्या आवाक्या बाहेर गेलेले आहेत. दिवसेंदिवस नवीन चार चाकी वाहनांचे दर खूप वेगाने वाढत आहेत. वाढते दर यामुळे बऱ्याच सर्वसामान्य नागरिकांना चार चाकी वाहन खरेदी करणे आवाक्या बाहेर दिसत आहे. जुनी गाडी घ्यायची म्हटलं की जास्त वापर झालेली गाडी घेणे शक्यतो टाळले जाते.

बऱ्याच लोकांकडून नवीन कार खरेदीसाठी बँकेकडून कर्ज घेतले जाते, परंतु या कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्यामुळे बँकेकडून वाहन जप्त केले जातात. मग जप्त केलेल्या वाहनांचे बँक तरी काय करणार म्हणून बँक या वाहनांचा लिलाव जाहीर करते. लिलावाच्या माध्यमातून बँक त्यांच्या कर्जाची वसुली करून घेते. बँक जप्त केला वाहनांचा लिलाव कधी करते तसेच कोण हे वाहने खरेदी करू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखात आपण पाहणार आहोत.
बँकेने जप्त केली वाहने ज्यावेळी लिलावात काढली जातात त्यावेळी बँक ही आपली गुंतवणूक केलेली रक्कम व वसूल करण्याच्या तयारीत असते. अशावेळी सर्वसामान्य व्यक्तींना लिलावामध्ये मिळणारी वाहने कमी किमतीत देखील मिळू शकतात. कारण बँकेचा आपण दिलेली कर्ज स्वरूपातील रक्कम वसूल करणे हा एकमेव उद्देश असतो.
Bank auction car बँकेने काढलेल्या वाहन लिलावाअंतर्गत कार खरेदी धारकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो कारण खरेदीदारांना कमी पैशातच चांगली कार मिळते. कार कमी रकमेत मिळते आणि कागदपत्रांची पूर्तता देखील बँक कडून करून दिली जाते.
लिलावातील वाहन कसे खरेदी करता येईल?
Bank auction car बँक लिलावाच्या माध्यमातून आपल्याकडे जमा झालेले वाहनांची माहिती पोर्टलवर अपलोड करते. या पोर्टलवर सादर केलेल्या माहितीच्या आधारे ग्राहकांना वाहन खरेदी करता येते. हे वाहन खरेदी करताना वाहन कमी पैशात तर मिळतेच तसेच बँक स्वतः वाहनाशी संबंधित असणारे सर्व कागदपत्रे ग्राहकांना स्वतः वितरित करते.
वाहन खरेदी करण्यासाठी लिलावाची माहिती बँकेच्या पोर्टलवर तसेच https://www.eauctionsindia.com/ पोर्टलवर अपलोड केली जाते त्यासोबतच आयबीए प्लॅटफॉर्मवर देखील माहिती प्रसिद्ध केली जाते या ठिकाणी जाऊन आपण लिलावामध्ये सहभाग नोंदवून आपणास हवे असणारे वाहन खरेदी करू शकतात.

लिलावापूर्वी हे काम कराच
लिलावामध्ये वाहन खरेदी करण्यापूर्वी वाहनांची सर्व माहिती तपासून घेणे आवश्यक आहे. लिलावाच्या पूर्वीच बऱ्याच बँका वाहन चाचणी तपासणी करण्याची परवानगी देतात, ज्यामध्ये आपण संपूर्ण वाहनाची तसेच कागदपत्रांची तपासणी करू शकता. वाहन लिलावात जाण्यापूर्वी त्या बँकेने नमूद केलेल्या अटी व नियम याची सविस्तर माहिती घ्या आणि वाहनाची मेकॅनिकल द्वारे तपासणी करूनच वाहन खरेदी करावे.
हे वाचा: जमिनीची मोजणी आता एक तासात.
लिलावात लागते बोली
बँकेने काढलेले लिलावामध्ये सहभागी झाल्यानंतर प्रत्येक वाहनांची बोली लागते. बोलीमध्ये जो ग्राहक सर्वाधिक बोली लावेल त्या ग्राहकाला ते वाहन दिले जाते. वाहनांची बोली ही बँकेने ठरवून दिलेल्या रकमेपासून सुरू केली जाते.
लिलावात सहभागी होण्यासाठी नोंदणी महत्त्वाची
वाहन खरेदी लिलावा दरम्यान सहभाग नोंदवण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी आपल्याला आपला आयडी प्रूफ बँकेची माहिती आणि इतर कागदपत्रे करावी लागू शकतात. आपण आपली नोंदणी पूर्ण केल्यानंतर आपल्याला लिलावामध्ये सहभागी होता येईल. लिलावामद्धे सहभागी झाल्यानंतर नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच त्या ठिकाणी बोली देखील लावता येते. Bank auction car
Bank auction car निष्कर्ष
विविध कारणामुळे वापरलेल्या सेकंड हॅन्ड गाड्या मार्केटमध्ये उपलब्ध होतात. जुन्या वाहनांचे खरेदी विक्री करण्यासाठी मार्केटमध्ये मोठ मोठ्या कंपन्या देखील समाविष्ट झाल्या आहे. या कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने वाहन खरेदी विक्री देखील केली जाते. ज्यामध्ये कार देखो, बाईक वाले, कारवाले, कार्स 24 यासारखे मोठमोठे ब्रँड निर्माण झाले आहेत. हे ब्रँड सेकंड हॅन्ड वापरलेले गाड्या मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करताना दिसून येत आहेत.
Bank auction car यामध्येच या ब्रँडचा देखील समावेश असतोच हे ब्रँड देखील त्या ठिकाणी बोली लावण्यासाठी उपलब्ध असतात. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जुन्या वाहनांची खरेदी विक्री करण्यापूर्वी त्याची वॉरंटी आणि नोंदणी प्रक्रिया व्यवस्थितरित्या तपासली जाते. ज्यामुळे वाहन खरेदी करणाऱ्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जाण्याची आवश्यकता पडत नाही.
Four wheelers cars