पंतप्रधान आवास घरकुल योजना पात्रता, लाभ आणि कागदपत्रे.

पंतप्रधान आवास घरकुल योजना  देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशांमध्ये पीएम आवास योजना म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला स्वतःचे घर उपलब्ध करून देण्याचा उद्देश ठेवण्यात आला. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना याआधी 1 लाख 50 हजार रुपये एवढी आर्थिक मदत दिली जात होती. परंतु राज्य शासनाने यामध्ये अधिकची भर घालत राज्यातील घरकुल लाभार्थ्यांना आता 2 लाख 10 हजार रुपयांचा लाभ वितरित करण्याची घोषणा 2025-26 च्या अर्थसंकल्पामध्ये केली आहे.

पंतप्रधान आवास घरकुल योजना अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी कोण पात्र असेल अर्ज कोठे करावा त्यासोबतच कागदपत्रे कोणती लागतील अनुदान किती मिळेल याची सविस्तर माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आज पंतप्रधान आवास घरकुल योजना विषयी माहिती घेणार आहोत. तुम्ही घरकुल योजना 2025 लाभ कसा घेऊ शकता हे जाणून घेणार आहोत. पंतप्रधान आवास घरकुल योजना काय आहे ? पीएम आवास योजना 2025 (ग्रामीण) अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी pmayg.nic.in वेबसाइटवर जाऊन अर्ज सादर करता येतो का? . याची सर्व माहिती तुम्हाला देण्यात आली आहे.

पंतप्रधान आवास घरकुल योजना
योजनेचे नावGharkul Yojana 2025
योजना सुरू कोणी केली केंद्र सरकार
योजना लाभार्थी भारतातील बेघर कुटुंब
योजनेचा लाभ2 लाख 10 हजार रुपयांची आर्थिक मदत
अर्ज प्रक्रिया ऑफलाइन नंतर ऑनलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://pmayg.nic.in/

पंतप्रधान आवास घरकुल योजना काय आहे?

प्रधानमंत्री आवास योजना ची सुरूवात 1 एप्रिल 2016 रोजी देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली. घरकुल योजना ग्रामीण भागातील त्या कुटुंबांसाठी आहे, ज्यांच्याकडे स्वतःचे पक्के घर उपलब्ध नाही.

पंतप्रधान आवास घरकुल योजना 2025 अंतर्गत देशातील गरीब आणि अत्यंत गरजू कुटुंबांना घर बांधण्यासाठी सरकार कडून आर्थिक मदत वितरित केली जाते. 2025 मध्ये लाभ मिळवण्यासाठी आपण नव्याने अर्ज देखील सादर करू शकता.

हे वाचा: बजेट सादर; लाडक्या बहिणींना 2100 नाहीच..

घरकुल योजनेचा लाभ कसा घ्यावा ?

घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी फक्त शहरी भागातील नागरिकच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. pm awas 2.0 च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपण आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकतात. ग्रामीण भागातील नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा सध्या तरी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. ज्या वेळी ग्रामीण भागातील नागरिकांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होईल त्या वेळी आपणास याची माहिती दिली जाईल.

घरकुल योजना 2025 ऑनलाइन अर्ज करा

घरकुल योजना 2025 ऑनलाइन अर्ज / प्रधानमंत्री आवास योजना – शहरी (PMAY-U) अंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराणे खालील पात्रता यांनी अटी पूर्ण केल्या पाहिजेत:

  • एक ओळखपत्र (आधार, पॅन, पासपोर्ट, किंवा ड्रायव्हिंग लायसन्स) असावे.
  • अर्जदार कायम भारताचा नागरिक असावा.
  • अर्जकर्त्यांकडे पक्के घर नसावे.
  • अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असावे.
  • वार्षिक उत्पन्न ३ लाख ते ६ लाख रुपये असावे.
  • अर्जदाराचे नाव राशन कार्ड किंवा बीपीएल यादीत असावे.
  • मतदार यादीत नाव असणे अनिवार्य आहे.

घरकुल योजना 2025 कागदपत्रे आवश्यक आहेत

  • आधार कार्ड
  • बँक खाते तपशील
  • निवास प्रमाणपत्र
  • जाती प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जॉब कार्ड किंवा जॉब कार्ड नंबर
  • स्वच्छ भारत मिशन (SBM) नोंदणी क्रमांक
  • मोबाइल नंबर
  • पासपोर्ट आकाराची फोटो

घरकुल योजना 2025 ऑनलाइन अर्ज करा (घरकुल योजनेचा फॉर्म कसा भरावा?)
पंतप्रधान आवास घरकुल योजना ऑनलाइन अर्ज / प्रधानमंत्री आवास योजनेचा शहरी भागासाठी लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा अवलंब करा.

  1. प्रथम, प्रधानमंत्री आवास योजना – शहरी (PMAY-U) च्या अधिकृत वेबसाइटवर जा. https://pmaymis.gov.in/pmaymis2_2024/PMAY_SURVEY/EligiblityCheck.aspx तुमच्यासमोर होम पेज उघडेल.
  2. त्या खलील क्लिक तो प्रोसेस या पर्यायावर क्लिक करा.
  3. आपल्या समोर सर्व कागदपत्रांची माहिती दाखवली जाईल सर्व माहिती वाचून प्रोसेस या पर्यायांवर क्लिक करा.
  4. त्या नंतर आपल्या समोर आपली पात्रता तपासणी फॉर्म उघडेल.
  5. पात्रता फॉर्म भरून पात्रता तपसा या पर्यायावर क्लिक करा.
  6. आपण पात्र असल्यानंतर आपल्या समोरील ओपन होणरा अर्जमध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.
  7. सर्व माहिती भरल्यानंतर आवश्यक असणारे कागदपत्रे अपलोड करा. सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात असावीत.
  8. कागदपत्रे अपलोड केल्या नंतर आपला अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करा.

या पद्धतीने , तुम्ही ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता. तपासणी झाल्या नंतर , लाभार्थ्यांना Sanction Order (स्वीकृती पत्र) दिले जाते, ज्यामध्ये योजने अंतर्गत मिळणारे लाभ दर्शवले जातात. हे पत्र आपल्या मोबाइल वर SMS च्या माध्यमातून देखील पाठवले जातात.

Leave a Comment