लेक लाडकी योजना फॉर्म मराठी अर्ज PDF पात्रता, कागदपत्रे.

लेक लाडकी योजना फॉर्म मराठी : महाराष्ट्र राज्य शासनाने 2024 मध्ये लेक लाडकी योजनेची घोषणा केली. या योजनेबद्दल 2024 मध्ये फक्त घोषणा करण्यात आली होती. आता ही योजना राज्याच्या महिला व बालविकास विभागाने अधिकृतपणे अंमलबजावणी करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. महिला व बाल विकास विभागाने या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी व योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी योजनेच्या नियम व अटी पात्रतेसाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे तसेच अर्ज कसा करायचा अर्ज तपासणी प्रक्रिया आणि लाभ वितरणाची प्रक्रिया.

लेक लाडकी योजना फॉर्म मराठी

लेक लाडकी योजना फॉर्म मराठी लेक लाडकी योजना याची संपूर्ण माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. अर्जाची पीडीएफ कुठे मिळेल ,अर्ज कसा भरावा व अर्ज कोठे सादर करावा याबद्दलची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. त्यामुळे लेखातील संपूर्ण माहिती शेवटपर्यंत वाचा जेणेकरून आपल्याला अर्ज करण्यासाठी कोणती अडचण निर्माण होणार नाही.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

राज्य शासनाने राज्यातील मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी तसेच मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी केली. राज्यामध्ये याआधी माझी कन्या भाग्यश्री योजना ऑगस्ट 2017 पासून लागू केली होती परंतु या योजनेला पाहिजे असा प्रतिसाद पालकांकडून तसेच महाराष्ट्र राज्यातील नागरिकाकडून मिळत नसल्यामुळे राज्य शासनाने 2023 24 च्या अर्थसंकल्पामध्ये राज्यामध्ये लेक लाडकी योजना सुरू करण्याची घोषणा केली. अर्थसंकल्पामध्ये घोषणा केल्यानंतर राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित करून याबद्दलच्या अटी नियम पात्रता आणि लाभ याची सविस्तर माहिती प्रसिद्ध केली. लेक लाडकी योजना फॉर्म मराठी

लेक लाडकी योजनेचे उद्दिष्टे

  • मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन राज्यातील मुलींचा जन्मदर वाढवणे.
  • मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
  • राज्यातील मुलींचा मृत्यू दर कमी करून बालविवाह रोखण्यास प्रोत्साहन देणे.
  • राज्यातील मुलींचे कुपोषण कमी करणे.
  • शाळा पाहिल्या मुलींचे प्रमाण शून्य करणे आणि प्रत्येक मुलीला शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.

लेक लाडकी योजनेचे नियम आणि अटी

  • लेक लाडकी योजना ही केशरी पिवळ्या रेशन रेशन धार कुटुंबांमधील मुलींसाठी लाभ देते.
  • मुलीचा जन्म एक एप्रिल 2023 व त्यानंतर जन्मला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींना या योजनेअंतर्गत लाभ वितरित केला जातो.
  • या योजनेमधून पहिले आपत्तेच्या तिसरा हप्ता मिळवण्यासाठी व दुसऱ्या अपत्याचे दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • जर दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी आपत्य जन्माला आली त्यातील एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ दिला जाईल परंतु हा लाभ मिळवण्यासाठी पती किंवा पत्नी यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एक एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी आणि त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जुळ्या मुलींना देखील या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल परंतु अशावेळी देखील पालकांची आई किंवा वडील यापैकी एकाची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असणे आवश्यक आहे
  • लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवाशासणी आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे राष्ट्रीयकृत बँक खाते महाराष्ट्र राज्यामध्ये असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयाच्या आत असणे आवश्यक आहे.

हे वाचा : या दिवशी मिळणार नमो शेतकरी योजनेचा 6 वा हप्ता

लेक लाडकी योजना लागणारे कागदपत्रे.

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हेच अर्जासोबत खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे खालील कागदपत्रांच्या आधारे आपण लेक लाडकी योजनेअंतर्गत अर्ज सादर करू शकता आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर आपण या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ घेऊ शकता. लेक लाडकी योजना फॉर्म मराठी

  • मुलीचा जन्माचा दाखला
  • कुटुंबाचा उत्पन्न प्रमाणपत्राचा दाखला एक लाखाच्या आत असणे आवश्यक
  • मुलीचे आधार कार्ड
  • पालकाचे आधार कार्ड आई किंवा वडील
  • राष्ट्रीयकृत बँक पासबुक
  • रेशन कार्ड केशरी कलर किंवा पिवळ्या कलरची
  • मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरिता मुलीला 18 वर्षे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. अठरा वर्षे पूर्ण असल्या सोबतच मुलीचे नाव मतदान यादीत जोडलेले असणे देखील बंधनकारक आहे.
  • प्रत्येक टप्प्याच्या वेळी लाभ मिळवण्यासाठी मुलगी शिक्षण घेत असल्याचा संबंधित शाळेचा बोनाफाईट पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र दुसऱ्या किंवा जुळ्या अपत्यासाठी
  • अंतिम लाभ मिळवण्यासाठी मुलीचा विवाह झाला नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र.

लेक लाडकी योजना अर्ज प्रक्रिया.

लेक लाडकी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराला स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येत नाही. अर्ज करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळील अंगणवाडी सेविका तथा पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांच्याकडे अर्ज सादर करावे लागतील. अर्ज आणि अर्जासोबत आपणास लागू असणारे आवश्यक सर्व कागदपत्रे जोडून आपला अर्ज अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांच्याकडे जमा करावा. अर्ज जमा केल्यानंतर संबंधित अधिकारी यांच्याकडून आपला अर्ज पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर केला जाईल. लेक लाडकी योजना फॉर्म मराठी

अर्ज सादर झाल्यानंतर महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा प्रतिनिधी यांच्याकडून आपल्या अर्जाची छाननी केली जाईल. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास आपणास कळवले जाईल व अर्जाची त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आपणास वेळ दिला जाईल. अर्ज मधील दिलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे व्यवस्थित असल्यास आपला अर्ज मंजूर करून पुढील लाभासाठी पात्र ठरविण्यात येईल.

लेक लाडकी योजना अर्ज कोठे करावा व कसा करावा

लेक लाडकी योजनेचा अर्ज आपण पद्धतीने सादर करावा लागतो हा अर्ज सादर करण्यासाठी आपण आपल्या गावातील किंवा शहरातील आपल्या जवळील अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन आपला अर्ज आणि अर्जासोबत आपली कागदपत्रे जोडून आपला अर्ज सादर करू शकता. या अर्जाबाबत अधिक माहितीसाठी आपण महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला शासन निर्णय देखील पाहू शकता. त्यासोबतच आपण आपल्या अंगणवाडी सेविका मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांच्याकडे देखील या योजनेबद्दलची आणि पात्रतेबद्दलची सविस्तर माहिती मिळू शकतात. लेक लाडकी योजना फॉर्म मराठी

या योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने स्वतः अर्ज सादर करता येत नसल्यामुळे ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो. आपण पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी अर्जाची पीडीएफ फाईल असणे आवश्यक आहे खाली आपल्याला अर्जाची पीडीएफ फाईल देखील देण्यात आलेली आहे ते पीडीएफ फाईल डाऊनलोड करून देखील आपण तिची प्रिंट करून त्यावर माहिती भरून आपला अर्ज आपल्या अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांच्याकडे सादर करू शकतात. लेक लाडकी योजना फॉर्म मराठी

लेक लाडकी योजनेअंतर्गत मिळणारा लाभ

लेक लाडकी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या मुलींना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते ही दिली जाणारी आर्थिक रक्कम वेगवेगळ्या टप्प्यानुसार वेगवेगळे रक्कम वितरित केली जाते खाली दिलेल्या माहितीनुसार आपल्याला टप्पा आणि मिळणारी रक्कम आपल्या लक्षात येईल.

  • मुलीचा जन्म झाल्यानंतर मुलीला 5000 हजार रुपये वितरित केले जातात
  • मुलगी इयत्ता पहिली या वर्गामध्ये प्रवेश केल्यानंतर मुलीला 6000 हजार रुपये एवढी रक्कम वितरित केली जाते
  • मुलगी इयत्ता सहावी मध्ये गेल्यानंतर मुलीला 7000 हजार रुपये वितरित केले जातात.
  • मुलगी अकरावी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर मुलीला 8000 हजार रुपये एवढी रक्कम वितरित केली जाते
  • तसेच मुलगी वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर व मुलीचे मतदान यादी ला नाव जोडल्यानंतर मुलीच्या बँक खात्यावर 75000 हजार रुपये एक रकमी जमा केले जातात.
  • यावरील टप्प्यानुसार अर्ज सादर केल्या व अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थी मुलींना शासनाकडून 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत एकूण 101000 रुपये एवढी रक्कम प्रोस्थान म्हणून वितरित केली जाते.

लेक लाडकी योजना फॉर्म मराठी

निष्कर्ष लेक लाडकी योजना फॉर्म मराठी

लेक लाडकी योजना या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ योजनेमध्ये पात्रतेबाबत अटी व नियम तसेच लाभ मिळवण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे याची सविस्तर माहिती आपण घेतली त्यासोबतच अर्ज कोठे करायचा अर्ज कसा सादर करायचा अर्जाची पीडीएफ अर्जासोबत लागणारी कागदपत्रे याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे परंतु याच्या व्यतिरिक्त ही जरी काही आपल्याला अडचणी निर्माण होत असतील काही शंका असतील ज्या कागदपत्र बद्दल असतील अर्ज बद्दल असतील किंवा पात्रतेबद्दल असतील आपण ही संकोचपणे आम्हाला व्हाट्सअप च्या माध्यमातून टेलिग्राम चॅनेल चे माध्यमातून किंवा कॉल च्या माध्यमातून विचारू शकता आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू

लेक लाडकी योजना फॉर्म मराठी शासन निर्णय

वारंवार विचारली जाणारी प्रश्न

  1. लेक लाडकी योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येतो का ?
  • लेक लाडकी योजनेचा अर्ज सद्यस्थितीमध्ये तरी ऑनलाईन पद्धतीने सादर करता येत नाही अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला आपण पद्धतीनेच अर्थ सादर करावा.

2. लेक लाडकी योजनेअंतर्गत पात्र मुलींना एकूण किती लाभ मिळतो?

  • लेक लाडकी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील मुलींना टप्प्याटप्प्याने 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ वितरित केला जातो.

3. लेक लाडकी योजनेमध्ये कोणत्या वयाच्या मुली पात्र असतील ?

  • लेक लाडकी योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी मुलीचा जन्म एक एप्रिल 2023 किंवा त्यानंतर झालेला असावा.

4. एक एप्रिल 2023 पूर्वीचा जन्म असेल तर लाभ मिळेल का ?

  • बऱ्याच नागरिकांकडून हा प्रश्न विचारला जातो 2001 एप्रिल 2023 पूर्वीचा जन्म असलेल्या मुलींना या योजनेअंतर्गत कोणतेही प्रकारचा लाभिपरीत केला जाणार नाही

5. लेक लाडकी योजना फॉर्म मराठी फॉर्म कुठे मिळेल ?

  • आपल्या आर्टिकल मध्ये लेक लाडकी योजनेचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी पीडीएफ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

6. एक लाख रुपये पेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबना लाभ मिळेल का?

  • एक लाख रुपये पेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचा लाभ वितरित केला जात नाही या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे.

7. पहिल्या मुलीला लाभ मिळाल्यानंतर दुसऱ्या मुलीला लाभ मिळेल का ?

  • या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी पहिल्या मुलीला या योजनेअंतर्गत लाभ मिळाला असेल तर दुसऱ्या मुलीला या योजनेअंतर्गत लाभ मिळेल परंतु त्या पालकांना ते दोनच अपत्ये असणे आवश्यक आहे.

लेक लाडकी योजना फॉर्म मराठी

Leave a Comment