cotton farming in India कापूस हे राज्यातील शेतकऱ्यांचे नगदी पीक. जिरायत शेतीत घेतल्या जाणाऱ्या या पिकावर राज्यातील शेतकऱ्यांचेच नाही तर देशातील बहुतांश शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून आहे. पण मागील काही काळापासून या कापसाची कहाणीच बदलली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दिवसेंदिवस परिस्थिती हालाखीची होत चालली आहे. उत्पादन खर्चात दरवर्षी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. परंतु मालाला मिळणाऱ्या भावांमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ पाहायला मिळत नाही. यामुळेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.
cotton farming in India नैसर्गिक आपत्ती तसेच पिकावर पडणारे विविध रोग यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत आहे. त्यातच कापसाला मिळणारा हमीभाव दरापेक्षाही शेतकऱ्यांच्या हातावर कमीच रक्कम मिळत असल्याने शेतकरी प्रत्येक वेळी या पिकाचे उत्पादन घेऊन तोट्यात जात आहे. पुढील हंगामामध्ये कापूस पिकामध्ये या विविध अडचणीमुळे आणि मिळणाऱ्या दरामुळे खूप मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. याचे कारण देखील विविध आहेत यामध्ये उत्पादन खर्चात वाढ आणि मिळणारे दर यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे कापूस पिकाचे क्षेत्र हळूहळू कमी होताना दिसून येत आहे.
cotton farming in India कापूस उत्पादक शेतकरी संकटातच
तोट्याची ची शेती करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या चे प्रमाण वाढत आहे. ही एक चिंता केंद्र सरकार तसेच राज्य सरकार समोर असून देखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या चक्रविहातून बाहेर काढण्याचे कोणताही पर्याय सरकारकडून निर्माण केले जात नाही. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा केल्या जातात परंतु प्रत्यक्षात मात्र कापूस या पिकाला सरकार कडून दुर्लक्ष केलं जातं. या मुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणी निर्माण होतात.
कापुस जातीबद्दल माहीती.
देशातील कापूस उत्पादन वाढवण्यासाठी देशांमध्ये बीटीचे आगमन करण्यात आले. बीटीचे वाणाचे आगमन झाल्यापासून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु त्यानंतर त्याच बियाण्यावर उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वाढवण्याची आवश्यकता भासली. परंतु दरामध्ये मात्र त्या प्रमाणात सुधारणा झाल्याची पाहायला मिळाली नाही.
देशामध्ये बीटी वानाशिवाय अजूनही दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे देशातील शेतकरी कापूस उत्पादन घेण्यास टाळाटाळ करत आहेत. अनेक देशांनी त्यांच्याकडे असणाऱ्या नवीन वान कापूस उत्पादकांना उपलब्ध करून दिला आहे. भारतात म्हणजे आपल्याकडे असे काम का केले जात नाही. अशी भूमिका सरकार का घेते हा बऱ्याच शेतकऱ्यांना देखील प्रश्न पडलेला आहे.
रोगामुळे कापूस उत्पादनात घट
भारतीय बीटी बियाणे कापसावर गुलाबी बोंड अळी, रसशोषक किडी, लाल्या विकृती या सारख्या रोगांनी समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे कापसावर अनेक फवारण्या कराव्या लागत आहेत. गंभीर बाब म्हणजे फवारण्यांची संख्या वाढवून देखील या रोग-किडींचे प्रभावी नियंत्रण होत नाही, हे पीक संरक्षण यंत्रणेचे अपयशच म्हणावे लागेल.
कापूस मंजूरी खर्चात वाढ
cotton farming in India कापूस लागवड केल्या पासून ते वेचणी पर्यन्त यातील बहुतांश कामे अजूनही मजुरांकडूनच होतात. यामध्ये हवे तसे यांत्रिकीकरण झालेले दिसत नाही. मजुरांची कमी उपलब्धता, मजुरीचे वाढलेले दर यामुळे देखील उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशावेळी कापूस शेतीत लागवड ते वेचणी यांत्रिकीकरण वाढायला पाहिजे.
फक्त कापूस वेचणी जरी पकडली तरी मंजूर 10 ते 20 रुपये किलो प्रमाणे दर घेतात. जो शेतकरी शेतात कष्ट करतो पिकासाठी खाते औषधे या साठी खर्च करतो त्याला शेवटी काय शिल्लक राहते हा विचार देखील करणे अवश्यक आहे. कापूस वेचणी साठी मजुरांना 10 ते 20 रुपये प्रती किलो देऊन शेतकऱ्यांना मागे शिल्लक किती हा विचार देखील करणे अवश्यक आहे.
प्रती किलो 70 रुपये जरी दर पकडला तरी शेतकऱ्याचा हातावर फक्त 50 रुपये शिल्लक राहतात. त्या 50 रुपया मध्ये शेतकऱ्यांना उत्पादन खर्च तरी निघतो का? याचा देखील विचार होणे अवश्यक आहे. cotton farming in India
हे वाचा: नवीन वर्षानिमित्त मोदी सरकारचे शेतकऱ्यांना गिफ्ट
हमीभाव देखील तोट्यातच
cotton farming in India कापसाच्या खेडा खरेदीत हमीभावापेक्षा कमी दर मिळतो. हमीभावाने कापूस खरेदीसाठी ‘सीसीआय’ने केंद्रे उघडली आहेत. परंतु त्यांची संख्या खूपच कमी आहे. सीसीआयच्या खरेदी केंद्रांतही नोंदणी ते प्रत्यक्ष कापसाचा काटा होईपर्यंत अनंत अडचणींचा सामना शेतकऱ्यांना नेहमीच करावा लागतो. त्यातच आता रुईचा उतारा कमी मिळत असल्याचे कारण देत हमीदर १०० रुपयांनी घटविला आहे. कापसाच्या खरेदीत व्यापक बदल करून उत्पादकांना किमान हमीभावाचा आधार मिळायलाच हवा, अशी व्यवस्था सरकार ला उभी करावीच लागेल.
कापूस पीक बाबत व्हावी सुधारणा
cotton farming in India जागतिक मंदीच्या सध्याच्या काळात सूत ते कापड निर्मिती प्रक्रियाही उद्योगही ठप्प आहे. अशावेळी कापूस प्रक्रिया उद्योगातील सर्व घटकांना काही सवलती द्याव्या लागतील.
कापूस, सूत, कापड निर्यातीच्या संधी शोधून त्यांची निर्यात वाढवावी लागेल. अशा प्रकारे कापसामध्ये वाण निर्मिती ते कापड निर्यातीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात संशोधन, सुधारणा, सवलती यामध्ये उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवून बदल करावे लागतील. त्या सोबतच कापूस उत्पादन खर्चाचा विचार करून शेतकरी हमीभावात सुधारणा करून करणे अवश्यक आहे.
कापूस पिकाला उत्पादन खर्चाचा विचार करून हमीभाव द्यावा. शेतकऱ्यांना आपला माल हमीभावाने विक्री करण्यासाठी आणखी खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांचा माल तत्काळ खरेदी करण्याची प्रक्रिया राबवावी. जर असे झाले तरच या पांढऱ्या सोन्याची झळाळी कायम राहील.cotton farming in India
1 thought on “cotton farming in india : पांढऱ्या सोन्याची मातीमोल कहाणी”