Mutual Fund : सेबी आणणार 250 रुपयांची sip.

Mutual Fund भारतीय शेअर बाजारातील प्रमुख संस्था सेबी आता सर्वसामान्य नागरिकांसाठी नवीन एसआयपी आणणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे देशातील नागरिकांना कमी पैशात देखील म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करता येणार आहे.

गुंतवणूक ही काळाची गरज आहे, आपल्या मुलांचे भविष्य तसेच आपले उतरते वय याचा विचार करता आपल्या दैनंदिन खर्चा मध्ये गुटवणूक हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. दैनंदिन किंवा आपल्या सोयीनुसार थोडी थोडी तरी गुंतवणूक आपल्या भविष्य नव्याने निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. गुंतवणूक करताना भविष्य आणि भविष्यातील गरज याचा विचार करूनच आपण गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

गुंतवणुकीत महिर असणाऱ्या व्यक्तीकडून नेहमीच सांगितले जाते की आपण आपल्या कमाई मधील 10 टक्के तरी रक्कम गुंतवणूक करणे आवश्यक आहे. गुंतवणूक ही खूप प्रकरची असते त्या मध्ये आपल्याला चंगली आणि फायद्याची वाटणारी अशी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. आज आपण अश्याच एक गुंतवणूक mutual fund या बद्दलची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.

Mutual Fund

भारतीय शेअर बाजारातील महत्त्वाची संस्था एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या चेअरमन माधवी पुरी बुच यांनी देशात 250 रुपयाची एसआयपी योजना सुरू करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या गोष्टीमुळे सर्वसामान्य नागरिकांना व छोट्या गुंतवणूकदारांना यामध्ये सहभाग नोंदवता येईल व त्यांना देखील म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करता येईल.

सेबीच्या चेअरमन माधवी पुरी बुज यांनी 250 रुपये sip ची घोषणा. स्टॉक एक्सचेंज डिपॉझिटर्स सोबत बोलताना एका कार्यक्रमादरम्यान केली.

250 रुपयांची एसआयपी मॅच्युअल फंड मध्ये खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांना सहभाग घेण्याची संधी निर्माण करून देईल त्यासोबतच म्युच्युअल फंडाच्या विस्तारामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ होईल अशी भूमिका त्यावेळी व्यक्त देखील केली.

म्युचल फंड मधील रक्कम मागील दहा वर्षात सहा पटीने वाढली आहे 2014 मध्ये मॅच्युअल फंड मध्ये एकूण 10.51 लाख कोटी एवढी रक्कम फंड मध्ये उपलब्ध होती तीच रक्कम आता 31 डिसेंबर 2024 पर्यंत 66.93 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

भारताची चीन मधील hmpv virus वर नजर.

Leave a Comment