farmer new year gift नव्या वर्षाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता – मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पूर्ण झाली. या बैठकीत देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी व फायद्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले, ज्यामुळे देशातील कृषी क्षेत्राला खूप मोठा आधार मिळाला आहे.
प्रधान मंत्री पीक विमा योजना २०२५-२६ पर्यंत मुदत वाढवली
farmer new year gift केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजना २०२५-२६ पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. या योजनांसाठी एकूण ६९,५१६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या संरक्षणासाठी मोठा आधार मिळणार आहे. विविध नैसर्गिक आपत्ति पासून होणारे शेती पिकाचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणर आहे.
रासायनिक डीएपी खतासाठी अनुदानाचा निर्णय महत्वाचा
शेतकऱ्यांना 50 किलो DAP खताची बॅग फक्त 1350 रुपयांनाच मिळेल, असा महत्त्वाचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या दरांमुळे केंद्र सरकारने डीएपीवर 3850 कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान आजच्या बैठकीत जाहीर केले आहे.
farmer new year gift DAP विशेष पॅकेज मंजूर
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीसाठी एनबीएस अनुदानाशिवाय डीएपीवर एकरकमी विशेष पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना ५० किलोची डीएपी बॅग पूर्वीप्रमाणेच 1350 रुपयांमध्ये मिळत राहील. Dap खताच्या दरामध्ये कोणतीही दर वाढ शेतकऱ्यांना सहन करावी लागणार नाही.
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सर्वसमावेशक चर्चा
farmer new year gift पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. पंतप्रधान पीक विमा योजनेत निधी वाढवण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. या योजनांमुळे अनेक शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी मदत झाली आहे.
शेतकऱ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी पाऊल
हे निर्णय शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तसेच त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. पिकांचे संरक्षण, स्वस्त खताचा पुरवठा आणि विमा कवच यामुळे शेतकऱ्यांचे जीवन अधिक सुरक्षित आणि समृद्ध होण्याची अपेक्षा आहे. सरकारच्या या विविध निर्णयामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ देखील होईल.
2 thoughts on “नवीन वर्षानिमित्त मोदी सरकारचे शेतकऱ्यांना गिफ्ट. farmer new year gift”