PM Kisan Yojana :
मागील बऱ्याच दिवसापासून पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हप्त्याची वाढ मिळणार असल्याची माहिती आपणास पाहायला मिळते. परंतु खरंच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हप्त्यामध्ये वाढ झाली आहे का? किंवा शेतकऱ्यांना मिळणारा पीएम किसान योजनेचा लाभ वाढवण्यात आला आहे का? याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखातून आपण पाहणार आहोत.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी देशात पीएम किसान सन्मान योजना राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6000 रुपये याप्रमाणे निधी देण्याचे घोषणा करण्यात आली. हा निधी तीन टप्प्यामध्ये म्हणजेच प्रत्येक चार महिन्याने 2000 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर वितरित केला जातो.

PM Kisan Yojana या योजने अंतर्गत किती शेतकरी लाभ घेतात
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील जवळपास 92 लाख शेतकरी याचा लाभ घेत आहेत. या योजनेतून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व उत्पन्न वाढ मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत मिळते. यामध्ये एकूण अर्ज केले शेतकऱ्यांची संख्या आणि पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या यामध्ये तफावत आढळली होती. त्यामुळे शासनाकडून केवायसी प्रोग्राम राबवून यामध्ये अपात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून लाभ देण्यात येत आहे.
PM Kisan Yojana हप्त्या मध्ये वाढ मिळणार का?
मागील बऱ्याच काळापासून विविध संघटना कडून तसेच विविध लोकप्रतिनिधी यांच्याकडून पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्याबाबतची निवेदने केंद्र सरकारला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येत आहेत. या निवेदनाचा किंवा मागणीचा केंद्र सरकारकडून खरंच विचार केला गेला आहे का? किंवा केंद्र सरकारने याबाबत काही निर्णय घेतला आहे का? घेतला असेल तर शेतकऱ्यांना आता किती रक्कम मिळणार? हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात होता त्यावरूनच आज आपण याबाबत सविस्तर खुलासा करण्याचा प्रयत्न करत आहोत.
हे वाचा: पीएम किसान नोंदणी प्रक्रिया
PM Kisan Yojana पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला दहा हजार रुपये किंवा वर्षाला 12 हजार रुपये द्या या मागणीचे अनेक निवेदने केंद्र सरकारला प्राप्त झाली. परंतु केंद्र सरकारने याबाबत अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय निर्गमित केलेला नाही. पुढील येणाऱ्या काळात केंद्र शासनाने याबाबत निर्णय घेतला तरच शेतकऱ्यांना वाढीव हप्ता म्हणजेच वाढीव रक्कम मिळू शकते. परंतु सद्यस्थितीमध्ये तरी केंद्र सरकारकडून कोणताही आदेश किंवा सूचना याबाबत देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी हप्ता वाढला आहे किंवा हप्ता वाढून मिळाला आहे अशा सर्व गोष्टीवर दुर्लक्ष करावे. कारण ज्यावेळी केंद्र सरकारकडून अशा पद्धतीची रकमेत वाढ केली जाईल. त्याची माहिती सर्व शेतकऱ्यांना देण्यात येईल तसेच कोणत्याही क्षणी ही रक्कम वाढवता येत नसते यासाठी बजेटमध्ये तरतूद करणे देखील आवश्यक असते. ज्या बजेटमध्ये या प्रकारची तरतूद केली जाईल त्याचवेळी शेतकऱ्यांना हा वाढून हप्ता द्यायचा किंवा नाही याबद्दल केंद्र सरकार निर्णय घेऊ शकतो.
PM Kisan Yojana सद्यस्थितीमध्ये तरी शेतकऱ्यांना फक्त वर्षाला सहा हजार रुपये याप्रमाणेच निधी मिळणार आहे. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये कारण अशा कोणत्याही रक्कम वाढीचा शासन निर्णय शासनाकडून निर्गमित करण्यात आला नाही किंवा काही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.
हे वाचा: गुंठेवारी जमिनीसाठी खरेदी-विक्रीची परवानगी मिळवण्यासाठी नवा मार्ग
2 thoughts on “PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेची रक्कम वाढवली आहे का?”