Navneet Kanwat : बीड मधील मस्साजोग येथील अत्यंत दुःखद घटना म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांचे निर्घृण पणे हत्या. या झालेल्या हत्याचा प्रतिसाद संपूर्ण राज्यभर दिसून आला. यातच हिवाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा खूप जोरावर धरण्यात आला. त्यातच आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी देखील हा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणावर उचलून धरला. त्या सोबतच राज्यातील बहुतांश आमदारांनी तसेच विरोधी पक्षातील नेत्यानी देखील हा मुद्दा जोरावर धरत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली.
बीड मधील सरपंच हत्याकांड या मुद्द्याला प्रत्युत्तर देण्यासाठी व संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील सविस्तर चौकशी करून जे काही या प्रकरणात गुन्हेगार असतील त्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल असे वक्तव्य केले. त्यासोबतच बीडच्या एसपींची तात्काळ बदली करत असल्याची माहिती देखील अधिवेशनाचे वेळी त्यांनी दिली होती.
एसपींच्या बदलीनंतर बीडचा बिहार होऊ नये यासाठी बीडला नवीन एसपी कोण येणार याबद्दल सर्वांचेच लक्ष लागले होते. यातच बीडमध्ये नवीन एसपी नवनीत कावत (Navneet Kanwat) यांची नेमणूक करण्यात आली आहे.
बीड प्रकरण अत्यंत तापलेले असताना तसेच बीडचा बिहार होऊ नये यासाठी बीड जिल्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्याकडून नवीन एसपींची नेमणूक करण्यात आली. परंतु हे नेमणूक करताना बीडमध्ये वाढत असलेले गुन्हेगारी रोखता यावी यासाठी नवीन जिम्मेदार व्यक्ती या ठिकाणी नेमणे देखील आवश्यक होतं. म्हणूनच प्रशासनाकडून बीड साठी नवनीत कामत (Navneet Kanwat)यांची नेमणूक करण्यात आली आहे.
नवीन एसपी नवनीत कावत (Navneet Kanwat) कोण आहेत?
Navneet Kanwat नवनीत कांवत हे 2017 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मूळचे राजस्थानचे असून त्यांचे वडील निवृत्त रेल्वे अधिकारी आहेत. कांवत यांचं सहावीपर्यंतचं शिक्षण मुरादाबादमध्ये झालं. सहावी ते 12 वी पर्यंतचं शिक्षण त्यांनी सैनिक स्कूल चित्तोडगढ इथे झालं. ते शाळेत एक सर्वसाधारण विद्यार्थी होते. वडिलांनी त्यांना एक आव्हान दिलं आणि नवनीत यांनी दहावी, 11 वी आणि 12 वी या तीन वर्षात सैनिक स्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. स्वत:वर विश्वास ठेवून त्यांनी दहावीत अव्वल क्रमांक पटकावला.
12 वीनंतर नवनीत यांनी आयआयटीमध्ये प्रवेश केला, तिथे त्यांनी बी टेक केलं. त्यांची आई शिक्षिका, वडील रेल्वेत होते, त्यांनी लहानपणापासून अधिकारी होण्याबाबत सल्ले दिले जात होते, पण नवनीत यांचा ओढा खासगी क्षेत्रात होता. नवनीत यांनी IIT मधून पदवी मिळवल्यानंतर त्यांनी सॉफ्टवेअर डिजाईन इंजिनिअर म्हणून एका खासगी कंपनीत नोकरी केली. यादरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु केला. स्पर्धा परीक्षेसाठी ते दिल्लीत आले. तिथे त्यांनी अभ्यास करुन ते 2017 मध्ये IPS अधिकारी बनले.
नवनीत कांवत हे या आधी छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपआयुक्त होते त्या ठिकाणावरून त्याची बदली करत बीड चे नवे पोलिस अधीक्षक हे पद त्यांना देण्यात आले आहे.
बीड मधील वाढत्या गुन्हेगारी नक्कीच ते रोखतील आणि बीड मधील सरपंच संतोष देशमुख याच्या हत्या प्रकरणात असणारे सर्वच आरोपी शोधतील अशी अपेक्षा बीड मधील सर्व सामान्य नागरिकांना नव्या पोलिस अधीक्षक यांच्याकडून आहे.
हे वाचा: बीड आणि परभणी घटनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाम भूमिका