gunthewari latest news महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना विविध उपयोगासाठी गुंठ्यामध्ये म्हणजेच एक गुंठा दोन गुंठे तीन गुंठे पाच गुंठे असे व्यवहार करण्यासाठी किंवा यासाठी खरेदी विक्री करण्यासाठी सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी रेडीरेकनरच्या 5 टक्के रक्कम म्हणुन सरकार ला भरावी लागणार आहे. त्या नंतर त्या गुंठ्याची खरेदी विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. परंतु हा होणारा व्यवहार फक्त विहीर, घर बांधणी आणि रस्त्या साठीच करता येतील अशी अट देखिल यात देण्यात आली आहे.
gunthewari latest news गुंठेवारी म्हणजे नेमक काय?
गुंठेवारी जमिनी त्या जमिनीला म्हणतात, ज्यावर पिके उगवण्यासाठी, घर बांधण्यासाठी किंवा इतर उपयोगासाठी लोकांनी जास्ताऱ्या प्रमाणावर उपयोग केला आहे, पण ती जमिन खरीदी-विक्रीच्या नोंदणीत कधीच आलेली नाही. या जमिनीसाठी विशेष नियम लागू आहेत, आणि त्यावर काम करण्यासाठी सरकारची परवानगी घेणे आवश्यक असते.
![gunthewari latest news](https://mdnews.in/wp-content/uploads/2024/12/20241222_214025.jpg)
1947 साली अमलात आलेल्या तुकडेबंदी नियमानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्यात आले होते. परंतु, या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे हस्तांतरण करण्यास कायदा नियमानुसार बंदी घालण्यात आली होती. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसमोरील अडचणीत खूप मोठी वाढ झाली आणि पैसे देऊनही अनेकांचे नागरिकांचे व्यवहार अडकून बसले. 2017 साली केलेल्या सुधारणेनुसार 1965 ते 2017 या कालावधीत झालेले तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्यासाठी बाजार मूल्याच्या 25 टक्के रक्कम सरकार ला जमा करण्याची अट घालण्यात आली होती. पण, ही रक्कम सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरील असल्याने बहुतेक लोक हा व्यवहार करण्यास आलेच नाहीत. ही अडचण दूर करण्यासाठी विद्यमान सरकारने ठरवलेल्या क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी-विक्री करून झालेले व्यवहार नियमित करण्यासाठी 2017 सालापर्यंतची मुदत 2024 पर्यंत वाढविली.
नवा नियम – 5% शुल्क भरून परवानगी मिळवा
gunthewari latest news सध्या महाराष्ट्र सरकारने एक नवीन नियम लागू केला आहे. यामध्ये, गुंठेवारी जमिनीसंबंधी खरेदी-विक्रीसाठी 5% शुल्क भरून परवानगी मिळवता येईल. याचा अर्थ, जर तुम्हाला गुंठेवारीजमिनीतून घर विकत घ्यायचं किंवा विक्री करायचं असेल, तर तुम्हाला 5 % शुल्क भरून अर्ज करावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला संबंधित अधिकार मिळतील.
gunthewari latest news नवीन नियमानुसार 25 टक्के शुल्काऐवजी पाच टक्के शुल्क भरून त्या जमिनी नियमित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार राज्यपालांच्या संमतीने 15 आक्टोबर 2024 रोजी अध्यादेशही काढण्यात आला. त्याचे अधिनियमात रूपांतर करण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत त्याचे विधेयक सादर केले. या विधेयकाला दोन्हीही सभागृहात मान्यता मिळाल्याने तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचा मोठा दिलासा राज्यातील नागरिकांना मिळणार असून, याबाबत महसूल विभागाने माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या नेमलेल्या समितीच्या शिफारशीही यासाठी विचारात घेण्यात आल्या आहेत.
कोणत्या घटकाला व्यवहार करण्यासाठी परवानगी मिळेल
- विहिरीसाठी गुंठेवारी खरेदी-विक्रीस परवानगी.
- शेती किंवा अन्य रस्त्यांसाठीही गुंठ्यांची करता येईल खरेदी-विक्री.
- रहिवासी क्षेत्रात (रेसिडेन्शियल) घर बांधण्यासाठी देखील गुंठ्यांच्या व्यवहारास परवानगी.
gunthewari latest news याचा फायदा काय होईल ?
- सुलभ प्रक्रिया: 5% शुल्क भरून खरेदी-विक्रीची परवानगी मिळाल्यामुळे, गुंठेवारी जमिनीच्या बाबतीत असलेल्या अडचणी कमी होऊ शकतात.
- कायदेशीर पारदर्शकता: शासकीय मार्गदर्शन आणि नियम पाळल्यामुळे खरेदी-विक्री कायदेशीर होईल.
2 thoughts on “gunthewari latest news गुंठेवारी जमिनीसाठी खरेदी-विक्रीची परवानगी मिळवण्यासाठी नवा मार्ग – 5% शुल्क भरून करा अर्ज!”