village drone fear : ड्रोन ज्या चक्रा आणि ग्रामीण भागामध्ये होणाऱ्या चोऱ्याचे प्रमाण यामुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना ड्रोन दिसला की धास्ती भरत आहे आणि रात्रभर जागून राखण करावी लागत आहे काय आहे नेमका प्रकार पाहुयात.
महाराष्ट्रात चोर आता हायटेक झालेले आहेत. याचं कारणही तसंच आहे कारण चोर ड्रोन च्या साह्याने गावातून सर्व परिस्थित चा आढावा घेण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर चोरी करण्याचा प्रयत्न करतात या पद्धतीची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांकडून देण्यात येते. यामागे काय कारण आहे. अचानक रात्री गावात किंवा गावाच्या भोवती एक ड्रोन येतो संपूर्ण गावाला चकरा मारून फिरून घेतो. आणि मग हा ड्रोन निघून जातो हा ड्रोन कुठून येतो कशासाठी येतो याचा कसलाही रीपोर्ट पोलिसांकडे नसल्याचे स्थिती आहे. ज्या गावात ड्रोन घिरट्या मारतो त्याच गावात चोऱ्या होत असल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात येत आहे. याच भीतीमुळे आता ग्रामीण भागातील नागरिक रात्रभर राखण करण्याचे काम करत आहेत.
village drone fear महाराष्ट्रातील प्रत्येक गावात ड्रोन ची नजर
राज्यातील अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन चकरा मारत असल्याचे नागरिकांना दिसून आले. यामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भाग टार्गेट केल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसापासून या ड्रोन मुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. हे ड्रोन अचानक येतं आणि सर्व गावातील नागरिकांचे लक्ष विचलित केले जाते. या ड्रोन च्या भीतीपोटी गावातील नागरीक रात्री बाहेर पडायलाही भीत आहेत. त्याचप्रमाणे चोऱ्यांचे प्रमाणही वाढलेले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकावर रात्रभर जागे राहून राखण करण्याची वेळ आलेली आहे.
लष्करा मार्फत फिरवली जातात का ड्रोन
village drone fear या ड्रोनच्या चक्रा बद्दल नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाला काही नागरिक हे ड्रोन लष्कर मार्फत फिरवली जातात असं सांगण्यात येतं जर असं असेल तर प्रशासनाकडून याबाबतचा काहीतरी खुलासा करण्यात आला असता. परंतु प्रशासनाला विचारणा केली असता प्रशासनाकडून याबाबत खुलासा करण्यात आला नाही. त्यामुळे नेमके ही ड्रोन चोरांची की लष्करांचे हे नागरिकांना समजत नाही किंवा प्रशासनाकडून याबाबत जनतेला जाहीर प्रकटन किंवा अधिकृत सविस्तर मिळत नाही.
या भागात फिरतात मोठ्या प्रमाणावर ड्रोन.
मागील दोन तीन महिन्यापासून मराठवाड्यात तसेच उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र मधील अनेक गावांमध्ये रात्री अपरात्री नागरिकांना ड्रोन दिसून आले. ज्यामध्ये छत्रपती संभाजी नगर, बीड, अहमदनगर या जिल्ह्यातील गावांचा मोठा समावेश आहे बीड मध्ये एकाच दिवशी 33 गावात ड्रोन दिसल्याची तक्रार देखील पोलिसांकडे करण्यात आलेली आहे.
शेतात झाली चोरी
तंत्रज्ञानाचा वापर करून चोर देखील हायटेक पद्धतीने चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्येच अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचे आपल्या शेतावरील ड्रोनच्या फेऱ्या वाढल्याचे सांगितले होते. या शेतकऱ्याच्या शेतातील डाळिंब बाग यामध्ये लाखो रुपयांची चोरी झाल्याचे उघड झाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मनात तसेच नागरिकांच्या मनात भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे कारण यावर प्रशासनाकडून अद्याप पर्यंत तरी पूर्णतः village drone fear कसलेही प्रकारचा खुलासा किंवा कार्यवाही करण्यात आलेली नाही.
नागरिकांच्या मनात शंका व भीती
या ड्रोनच्या चक्रा आणि चोऱ्यांचे वाढलेले प्रमाण यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामध्ये लष्करी प्रशासनाने जरी याबाबत काही मोहीम राबवली असली तरी त्याचा थोडा का होईना खुलासा केला पाहिजे या पद्धतीचे वक्तव्य नागरिकांमधून करण्यात येत आहे. त्यासोबतच या ड्रोन बाबत (village drone fear) प्रशासनाकडून काहीच कारवाई किंवा मार्गदर्शन नागरिकांना केले जात नसल्यामुळे नागरिकांच्या मनात मोठ्या प्रमाणावर शंका निर्माण होत आहेत. काहीजण याला लष्करी ड्रोन असे म्हणतात तर काहीजण याला चोरट्यांचं ड्रोन या नावाने संबोधित करतात यामध्ये विविध नागरिकांनी आपल्या तक्रारी पोलीस खात्याकडे केलेले आहेत परंतु यामध्ये पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा खुलासा किंवा माहिती नागरिकांना देण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
पोलिसांनी काय दिली माहिती
village drone fear ग्रामीण भागात होत असलेले ड्रोनच्या चक्रा यावर पोलीस प्रशासनाला विचारले असता पोलीस प्रशासनाकडून. पूर्ण खुलासा करण्यात आला नाही परंतु नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही हे भारतीय लष्कर मार्फत एक मोहीम राबवली जात असल्याचे सांगितले आहे. तसेच नागरिकांनी घाबरू नये या बाबत देखील अवाहण करण्यात आले आहे. ही मोहीम कशासाठी राबवली जाते हे मात्र गुपितच ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
village drone fear तसेच ज्या भागात मागील दोन महिन्यापासून ड्रोन फिरत आहेत त्या सर्वच भागात चोऱ्या झाल्याची कसलीही नोंद नाही. अपवादात्मक एकाद्या ठिकाणी ड्रोन आणि चोरी चे प्रकार दिसून येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या मुले नागरिकांनी ड्रोन हे चोरांचे आहेत ही भीती मनात बाळगू नये अशा सूचना देखील दिल्या आहेत.
हे वाचा : मुख्यमंत्री वयोश्री योजना