tirupati laddu : तिरूपति बालाजी च्या प्रसदामद्धे भेसळ. तिरुपती बालाजी मध्ये वाटप केल्या जाणाऱ्या प्रसाद मध्ये पशु चरबी वापरले असल्याची टीका मुख्यमंत्री यांनी केली यावर तपासणी सुरू केले असता या तपासामध्ये जे नमुने तिरुपती ट्रस्ट कडून प्रयोगशाळेला पाठवण्यात आले होते या नमुन्याचा अहवाल पाहून जवळपास देशातील सर्वच नागरिक हैराण झाले आहेत. या रिपोर्टमध्ये प्रसादा मध्ये प्राण्यांची चरबी वापरली असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या मध्ये बिफ टॅलो व लॉर्ड घटक असल्याचे सांगितले जात आहे.

बुधवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी काँग्रेस पक्षाच्या माजी सरकारवर प्रसिद्ध तिरुपती लाडू TTD मध्ये कमी दर्जाचे घटक आणि प्राण्यांचे चरबी असल्याचा आरोप केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली त्यानंतर त्यांनी दावा केला की गुजरातमध्ये एका प्रयोगशाळेत लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात गोमास चरबी आणि माशाचे तेल सापडले आहे या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून तिरुमाला तिरुपती देवस्थान पुरवठा दाराला काळी यादी टाकले आहे. परत्नू माजी मुख्यमंत्री यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला आहे.
बिफ टॅलो म्हणजे काय
tirupati laddu गाय आणि बैल यासारख्या प्रणाच्या अवयवा भोवती फॅटी टिश्यू रेडर करून बीफ टॅलो तयार केले जातो, त्यांच्या नावाप्रमाणे गोमास त्याला विशेषता गाईपासून येते. हे बऱ्याचदा तळण्यासाठी आणि भाजण्यासाठी वापरले जाते. परंतु ते साबण आणि मेणबत्तीच्या उत्पादनात देखील आढळू शकते. हे मासापासून काढून टाकलेली चरबी वितळवून देखील बनवता येते जे नंतर थंड होते आणि लोण्यासारखे मऊ घन बनते.
लॉर्ड म्हणजे काय
tirupati laddu आज बराच स्वयंपाक घरामध्ये चरबीची जागा मोठ्या प्रमाणात वनस्पति तेलाने घेतले आहे. ही अर्धगण पांढरी चरबी डुकराच्या फॅटी टिश्यूच्या प्रस्तुतीकरनाद्वारे प्राप्त केली जाते. आणि डुकराचे मास खाणाऱ्या समुदायांमध्ये हे मुख्य आहे. एकेकाळी हा एक सामान्य घटक होता. परंतु आता अनेक स्वयंपाकीसाठी वनस्पती तेलांना प्राधान्य दिले जात आहे जुन्या काळात वापरला जाणारा पदार्थ म्हणजेच लॉर्ड.