अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करण्याचे कृषीमंत्र्याचे आदेश
अतिवृष्टीमुळे नुकसान राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे त्यात मराठवाड्यात मागील चाळीस वर्षांचे रेकॉर्ड तोडले या पावसाने राज्यातील तसेच मराठवाड्यातील बहुतांश भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पिकांचे तसेच शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले यामध्ये पाळीव प्राणी असतील किंवा माणसे हेही दगावले आहेत या पावसात बऱ्याच ठिकाणी रस्ते तसेच घरे देखील वाहून गेले आहेत.
मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पाच लाख हेक्टर पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे तसेच ज्या शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करा असे आदेश देखील कृषिमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत अतिवृष्टीमुळे नुकसान.
कोणत्या ठिकाणी जास्त अतिवृष्टीमुळे नुकसान झाले
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, जालना, धाराशिव, या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेत पिके अक्षरशः वाहून गेली आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांचे फक्त पिकच नाही तर स्वप्नही वाहून गेले आहेत. यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा किंवा शासनाकडून काहीतरी मदत मिळावी अशी आशा आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या भागातील अधिकाऱ्यांकडे आपल्या पीक नुकसानीच्या तक्रारी दिल्या आहेत.
कृषिमंत्र्यांनी पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना दिलेले आदेश
राज्यात सर्वत्र पाऊस पडत असताना शेतकऱ्यांच्या शतकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या नुकसानी करता शासनाकडून काहीतरी मदत मिळावी ही शेतकऱ्यांची आशा आहे. यावरच राज्याची कृषिमंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला पीक नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच ज्या भागात जास्त पाऊस आहे त्या भागातील नागरिकांना अलर्ट राहण्याबाबत देखील त्यांनी आवाहन केले आहे.
यासोबतच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ज्या शेतकऱ्यांनी आपला पिक विमा भरलेला आहे आणि त्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांनी आपली पीक नुकसान तक्रार क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून किंवा पिक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक च्या माध्यमातून कंपनीला देणे आवश्यक आहे त्याबाबत शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नुकसान झालेली तक्रार दाखल करावी याबाबत देखील शेतकऱ्यांना सुचित केले आहे.
पावसामुळे पीक जळून जात आहे.
बऱ्याच भागात पावसामुळे पीक जळून गेले आहे किंवा त्याची जाळण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्येच बीडमध्ये एका शेतकऱ्याचे पीक अक्षरशः उभे असताना देखील जळण्याच्या वृत्तीत आहे. त्याबद्दलचा व्हिडिओ देखील त्या शेतकऱ्याने प्रशासनाला तसेच बहुतांश भागातील शेतकऱ्यांना शेअर केला आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता या कापूस पिकाचे उभे असताना देखील जाळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यावर काय पर्याय काढावा प्रशासनाने याबाबत काहीतरी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
2 thoughts on “अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करण्याचे कृषीमंत्र्याचे आदेश”