मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज सुरू मिळणार 3000 रुपये लाभ

By md news

मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज सुरू मिळणार 3000 रुपये लाभ

   महाराष्ट्राचे सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना अमलात आणली या योजनेच्या माध्यमातून 65 वर्ष किंवा त्याहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरात येणाऱ्या उपकरणासाठी आर्थिक सहाय्य केले जाणार आहे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचे अंतर्गत लाभ मिळणार आहे हा लाभ 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तींना दिला जाणार आहे त्याबद्दलची अधिक माहिती आपण खाली पाहत आहोत

मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केली आहे या कल्याणकारी योजनेचे मार्फत राज्यात 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून त्यांच्या दैनंदिन उपयोगी वस्तू खरेदीसाठी तीन हजार रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे ही रक्कम ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यावर डीबीटीच्या मार्फत वर्ग केली जाते यामध्ये नागरिकांना अर्ज करणे आवश्यक आहे हा अर्ज कसा करायचा याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत त्यासोबतच या अर्जाची पीडीएफ देखील आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना

वयोश्री योजना लागणारे कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचे मतदान कार्ड
  • अर्जदाराचे नॅशनल बँकेचे बँक पासबुक
  •  अर्जदाराचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
  • स्वयंघोषणापत्र 
  • मोबाईल क्रमांक

वयोश्री योजना अर्ज कसा करावा

योजनांमध्ये सरकारकडून सद्यस्थितीत तरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत नाही यामध्ये जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्या अर्ज सोबत वर दिलेली सर्व कागदपत्रे व अर्जात विचारलेली माहिती व्यवस्थित भरून आपल्या जवळील समाज कल्याण या कार्यालयात सादर करायचे आहे आपण अर्ज सादर केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणाहून एक अर्ज प्राप्त झाल्याची पावती देखील दिली जाते.

Leave a Comment