ration kyc update देशामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत देशातील गरीब व व गरजू व्यक्तींना अत्यंत कमी दारात अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा विभागाने लाभार्थ्यांची केवायसी करणे बंधनकारक केले आहे. या केवायसी मुळे योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नावे यातून वगळण्यात येतील या हेतूने ही केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.
जे लाभार्थी केवायसी करणार नाहीत त्यांना रेशन कार्ड अंतर्गत मिळणाऱ्या अन्नधान्याचा पुरवठा बंद केला जाणार आहे. त्यामुळे पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी आपला पुरवठा अखंडित सुरू ठेवण्यासाठी केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
ration kyc update कुठे करावी लागेल केवायसी
रेशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट असलेल्या व्यक्तींनी आपल्या जवळील किंवा आपण लाभ घेत असलेल्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन आपली केवायसी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. रेशन दुकानात गेल्यानंतर त्या ठिकाणी ई पोंस मशीनच्या सहाय्याने तुमचा आधार नंबर तुमच्या रेशन कार्डशी जोडून, बायोमेट्रिकच्या मदतीने तुमची केवायसी अगदी सोप्या पद्धतीने पूर्ण केली जाते. केवायसी करणेसाठी अगदी दोन मिनिटांचा वेळ लागतो.
ई-केवायसी प्रक्रिया निशुल्क
शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात की केवायसी प्रक्रिया निशुल्क करण्यात आलेली आहे. स्वस्त धान्य दुकानातील एपोस मशीनद्वारे प्रत्येक शिधापत्रिका धारकांनी कुटुंबातील सदस्यांची केवायसी करून घ्यावीत केवळ आधार कार्ड क्रमांक टाकून ही प्रक्रिया पूर्ण केले जाते ही प्रक्रिया पूर्ण केल्याने लाभार्थ्यांचे रेशन बंद होऊ शकते ही केवायसी करण्यास रेशन दुकानदाराचे पैसे मागितले अस तक्रार करण्यास सूचना दिले आहे.
रेशन केवायसी पूर्ण झाली आहे का असे तपासा
ई-केवायसी बनावट लाभार्थ्यांचा शोध
ration kyc update रेशन कार्ड वर मोफत रेशन मिळवण्याच्या योजनेसाठी अपात्र असताना अनेकदा स्वस्त धान्य घेत असतात. याशिवाय अनेक लोक सध्या या जगात नसून त्यांच्या मृत्यू झाला असून तरी मात्र अद्यापही त्यांच्या नावे शिधापत्रिकेमध्ये आहेत आणि दुसरीकडे बनावट रेशन कार्ड काढून शासकीय योजनेचा लाभ घेतला जातो आहे.
या पार्श्वभूमीवर आता सर्व शिधापत्रिकाधारक म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्यांची नावे नोंदवले आहे. त्यांना एक केवायसी करावी लागणार आहे. त्यासाठी त्यांच्या जवळच्या अन्नपुरवठा विभागाच्या करायला जाऊ शकता पण रेशन कार्ड वरील जो कोणी सदस्य मुदतीत ही केवायसी करणार नाही त्यांचे नाव शिधापत्रिकेत काढले जाणार आहे.
ई-केवायसी करण्यासाठी शेवटची मुदत.
ration kyc update रेशन कार्ड धारकांना ज्यांची नावे शिधापत्रिका मध्ये आहे. त्यांना आता ई केवायसी करणे अनिवार्य आहे जर केले नाही, तर शिधापत्रिका मधून नाव वगळण्यात येणार आहेत. आणि स्वस्त मिळणारे धान्य हे बंद होणार आहे. रेशन कार्ड kyc करण्यासाठी या आधी 3 ते 4 वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता मिळालेल्या मुदत वाढीनुसार 31 डिसेंबर 2024 पर्यन्त लाभार्थी यांना आपल्या जवळील स्वस्त धान्य दुकानात जाऊन आपली kyc पूर्ण करता येणार आहे.
1 thought on “ration kyc update : रेशन कार्ड धारकांनो लाभ हवा असेल तर लवकरच करा हे काम! अन्यथा होणार रेशन बंद.”