राज्यातील बहुतांश भागात सध्या अतिवृष्टी झालेली आहे तर काही जिल्ह्यात सरासरी पेक्षाही जास्त पाऊस झाल्याचे शेतकऱ्यावर संकट आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून एक रुपयात पिक विमा pik vima योजना देण्याची घोषणा केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या योजने अंतर्गत शेतकरी सहभाग नोंदवत आहेत.
परंतु मागील काही वर्षांपासून शेतकरी या योजनेत सहभागी होत आहेत आणि त्यांना लाभ मिळणे शक्य होत नाही. याचं कारणही तसंच आहे कंपनीच्या काही अटी व नियम आहेत. त्या नियमांचे शेतकऱ्याने पालन न केल्यास शेतकऱ्यांना पिक विमा दिला जात नाही.
यामध्ये शेतकऱ्याचं पिकाचे नुकसान झालेल असतं परंतु पिक विमा pik vima देखील मिळत नाही आज आपण हा पिक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना कोणती कारवाई करणे आवश्यक आहे याबद्दलची माहिती घेणार आहोत
विविध नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून जसे अतिवृष्टी कीड पावसाची ओढ यासारख्या घटकामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे नुकसान होत असतं.
त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो हा फटका बसू नये याकरिता केंद्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना अमलात आणण्यात आली.
यंदा महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक रुपया पिक विमा देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार शेतकऱ्यांचा हिस्स्याच्या विमा हप्ता महाराष्ट्र राज्य शासन भरणार आहे त्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या अर्ज करण्याच्या संख्येमध्ये वाढ दिसत आहे.
परंतु शेतकऱ्यांना अर्ज केले जरी असले तरी शेतकऱ्यांनी आपल्या पीक नुकसानाची तक्रार त्या कंपनीकडे करणे आवश्यक आहे तरच त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे वितरण केलं जातं
pik vima तक्रार नेमकी करायची कशी
शेतकऱ्यांना आपल्या पीक नुकसानीची तक्रार करण्याची विविध प्रकार आहेत त्याची आपण खाली चर्चा करूया
आपल्या पिकाचं नुकसान झाल्यानंतर आपण पुढील 72 तासाच्या आत कंपनीला पूर्व सूचना देणे आवश्यक आहे
ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून तक्रार नोंद करणे
आपल्या पिकाचे नुकसान झाले असल्यास आपण प्रधानमंत्री फसल बीमा योजना या ॲपच्या माध्यमातून आपले पीक तक्रार कंपनीकडे पाठवू शकता
अॅप च्या माध्यमातून अशी करा तक्रार : पीक विमा नुकसान तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया
हेल्पलाइन नंबर वर कॉल करून तक्रार दाखल करणे
शेतकऱ्यांना पिकाची नोंद करण्यासाठी ॲपच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही कारणाच्या माध्यमातून तक्रार करणे शक्य न झाल्यास शेतकरी आपली तक्रार 18001801551 या टोल फ्री नंबर वर संपर्क साधून देखील आपली तक्रार दाखल करू शकतात pik vima
कृषी कार्यालयात अर्ज करून तक्रार दाखल करणे
वरती सांगितलेल्या दोन्ही पर्याव्यतिरिक्त आपण कृषी कार्यालयात आपल्या कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांना आपल्या पीक नुकसान झाल्याची तक्रार लेखी स्वरूपात देऊ शकतात त्यांच्याकडून ती तक्रार कंपनीकडे पाठवण्यात येते व कंपनी पुढील कारवाई करते
1 thought on “pik vima: पिक नुकसान तक्रार कधी व कोठे करावी.”