ladaki bahin decembar hapta महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक विकासासाठी व महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांमध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै 2024 मध्ये करण्यात आली या योजनेचे अंतर्गत राज्यातील महिलांना निवडणुकीपूर्वीच पाच हप्त्यांचे यशस्वीरित्या वितरण देखील करण्यात आले.
बहुतांश महिलांच्या मनात निवडणुकीनंतर हप्ते मिळणार का ? किंवा लाडकी बहीण योजना बंद होणार का असे व या प्रकारचे विविध प्रश्न निर्माण होत होते यावरच हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हप्त्याबाबत आणि योजनेबाबत स्पष्टता दिली आहे.
ladaki bahin decembar hapta
राज्यात विधानसभा निवडणुका होऊन एक महिना उलटला आहे. यामध्ये महायुती सरकारला खूप मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आहे. महायुती सरकारच्या म्हणण्यानुसार लाडकी बहीण योजनेत पात्र असणाऱ्या महिलांनीच आमचे सरकार स्थापन करण्यास सहकार्य केले. त्यामुळे एवढ्या बहुमताने आम्ही सरकार स्थापन करू शकलो.
डिसेंबर हप्त्याबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
ladaki bahin decembar hapta यावर हिवाळी अधिवेशन दरम्यान सभागृहात बोलताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही योजना बंद होऊ देणार नाही याबद्दलची घोषणा केली त्यासोबतच अधिवेशन संपल्यानंतर लगेचच महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करणार असल्याची माहिती देखील दिली आहे.
कोणाला मिळेल हप्ता
लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यांना याआधी यशस्वीरित्या पाच हप्ते मिळाले आहेत. त्या महिलांना हा सहावा हप्ता म्हणजे डिसेंबर चा हप्ता मिळणारच आहे. परंतु काही महिलांना याआधी एकही हप्ता मिळालेला नाही ज्यामध्ये विविध कारणे आहेत, जर अर्जदार महिला खरोखरच पात्र असेल तर त्या महिलेला मागील सर्व लाभ वितरित केला जाणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.
हे वाचा: गेट वे ऑफ इंडिया का बोटीचा अपघात.