agri project : कृषी, पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित 23,300 कोटींचे प्रकल्प देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील कृषी, पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित 23 हजार 300 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे शुभारंभ करण्यात आले. 5 ऑक्टोंबर रोजी वाशिम जिल्ह्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीत पोहरादेवी येथे बंजारा समाजाचे सांस्कृतिक प्रतीक असलेल्या नंगारा भवन या सांस्कृतीत संग्रहालयाचे उद्घाटन पण करण्यात आले.
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी वाशिम जिल्ह्यातील आयोजित कार्यक्रमादरम्यान, सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मानिधी 20,000 कोटी रुपयांचा 18 व हप्ता वितरित केला. हा हप्ता वितरित केल्याने , या योजनेअंतर्गत सुमारे 3.45 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी प्रधानमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचेही वितरण करण्यात आले.
यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय पंचायत राज्यमंत्री राजीव रंजन उर्फ ललन सिंह, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह या कार्यक्रमादरम्यान इतर मंत्री उपस्थित होते.
agri project कृषी पायाभूत सुविधा निधी
पंतप्रधान कृषी पायाभूत सुविधा निधी (AIf) अंतर्गत कस्टम हायरिंग सेंटर, प्राथमिक प्रक्रिया युनिट, गोदामे, वर्गीकरण आणि ग्रेडिंग युनिट, कोल्ड स्टोअरेज प्रकल्प, काढणीपश्चात व्यवस्थापना प्रकल्प यांचा समावेश आहे, प्रधानमंत्री यांनी सुमारे 1,300 कोटी रुपयांच्या एकत्रित उलाढालीसह 9,200 शेतकरी उत्पादक संघटनाचे (FPOS) लोकार्पण यावेळी करण्यात आले आहे. agri project त्यांनी गुरांसाठी युनिफाईड जीनोमिक चिप, देशी गुरांसाठी GAUCHIP आणि म्हशीनसाठी MAHISHCHIP, जीनोटाइपिंग सेवांसोबत विकसित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पशुधनात वाढ करण्यासाठी त्यांना परवडणाऱ्या किमतीत लिंग-वर्गीकृत विर्याची उपलब्धता वाढविण्याच्या हेतूने आणि त्याची किंमत प्रति मात्रा सुमारे 200 रुपयापर्यंत कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
agri project कृषी व पशुसंवर्धन क्षेत्राचे महत्व:
- देशाच्या उत्पन्नात आर्थिक मदत: कृषी क्षेत्र GDP मध्ये मोठा वाटा उचलतो, विशेषतः ग्रामीण भागात.
- अन्न सुरक्षपुरवठा : लोकसंख्येच्या वाढीसोबत अन्नाची उपलब्धता सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे.
- रोजगार निर्मिती: लाखो लोकांचा रोजगार या क्षेत्रात आहे, त्यामुळे ग्रामीण बेरोजगारी कमी करण्यास मदत होते.
- संसाधन व्यवस्थापन: नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन व संवर्धन यासाठी कृषी आणि पशुसंवर्धन आवश्यक आहे.
- संस्कृती व परंपरा: स्थानिक कृषी पद्धती व पशुसंवर्धन परंपरांचा सांस्कृतिक महत्त्व आहे.
सरकार समोरील आव्हाने:
- पाण्याचा अभाव: सर्व भागात पाण्याचे प्रमाण कमी जास्त होणे .
- आर्थिक दबाव: कृषी उत्पादनाचे दर अस्थिर असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक ताण.
- तंत्रज्ञानाची अभाव: आधुनिक तंत्रज्ञानाचा कमी वापर.
- जलवायु बदल: हवामानातील बदलामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम.
- कृषी धोरणांची अस्थिरता: धोरणांतील बदलामुळे शेतकऱ्यांना अडचणी येतात.
- शिक्षणाची कमी: शेतकऱ्यांना आवश्यक माहिती व तंत्रज्ञानाबद्दल जागरूकतेचा अभाव.
agri project उपाययोजना:
- पाण्याचे व्यवस्थापन: शेती साठी नवीन तंत्रज्ञान व धोरणे, जसे की ड्रिप इरिगेशन आणि रेनवाटर हार्वेस्टिंग.
- आर्थिक समर्थन: शेतकऱ्यांसाठी कमी व्याजदराच्या कर्ज योजनांचा वापर वाढवणे.
- तंत्रज्ञानाचा वापर: आधुनिक शेती तंत्रज्ञान व इतर संसाधनांचा वापर करून उत्पादन वाढवणे.
- शिक्षण व प्रशिक्षण: शेतकऱ्यांसाठी गावातच कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजण करणे.
- कृषी विमा योजना: नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षणासाठी महत्व पूर्ण कृषी विमा योजना निर्माण करणे.
- उत्पादन प्रक्रिया सुधारणा: कृषी प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन व गुणवत्ता सुधारणे.
- मार्केटिंग उपाय: शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेत पोहचविण्यासाठी सहकारी संघटनांचे समर्थन करणे तसेच नवीन बाजारपेठ निर्माण करण्यास प्रोस्थाहन देणे.