Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडे यांनी दिला राजीनामा.

Dhananjay Munde Resignation महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी शेवटी राजीनामा दिला आहे. बीडच्या मस्साजोग येथील (Beed Massajog) सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh case) हत्या प्रकरणात, धनंजय मुंडे यांचे जवळचे वाल्मीक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती.

Dhananjay Munde Resignation

संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो उघडकीस आल्यानंतर, राज्य भरातून एक संतापाची लाट निर्माण झाली होती. अखेर महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांचे पीए प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द. Dhananjay Munde Resignation

थोड्याच वेळात धनंजय मुंडे यांच्या कडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार असल्याची माहिती दिली आहे.काल रात्री झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांना धनंजय मुंडे राजीनामा देत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुंडे राजीनामा आज देतील असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. मुंडे थोड्याच वेळात आपल्या पिए यांच्या माध्यमातून राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागील आठवडा भरापासून मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा यावर चर्चा सुरू होती, मात्र मुख्यमंत्र्यांकडून दोन वेळा क्लीनचीट देण्यात आल्यामुळे राजीनामा घेण्यास उशीर झाला असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री याची भूमिका ठाम

देवेंद्र फडणवीस याची प्रतिक्रिया

Dhananjay Munde Resignation धनंजय मुंडे यांनी सादर केलेला धनंजय मुंडे याचा राजीनामा मी स्वीकारला असून पुढील कार्यवाही साठी मी हा राजीनामा राज्यपाल यांच्या कडे सुपूर्त करत आहे. महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे याचा राजीनामा मी स्वीकारून त्यांना कार्य मुक्त केले आहे.

राजीनामा स्वीकारून महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे याना कार्य मुक्त करत पुढील कार्यवाही साठी राज्यपाल यांच्याकडे राजीनामा सुपूर्त करत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.


Leave a Comment