buldhana hair loss : शेगाव तालुक्यात टक्कल पडण्याच्या प्रकरणांची वाढ
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात सहा गावांमध्ये लोकांच्या केस गळण्याचे आणि टक्कल पडण्याचे प्रकार झपाट्याने वाढले आहेत. आतापर्यंत 100 पेक्षा अधिक रुग्ण या भागात आढळले असून, फक्त एकाच दिवशी 36 नवीन रुग्ण समोर आली आहेत.
लोणार सरोवर आणि केस गळती आजाराचे कनेक्शन?
अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी अंदाज व्यक्त केला आहे की लोणार सरोवराचे पाणी भूगर्भात झिरपल्याने त्यातील घटक या आजाराचे कारण असू शकतात.
पाणी आणि त्वचेसंबंधी चाचण्या सुरू
- पाण्याचे नमुने तपासणीसाठी:
- शेगावमधील पाण्यात नायट्रेट आणि क्षारांचे प्रमाण अत्यंत जास्त असल्याचे निष्पन्न झाले आहे.
- नागपूर आणि पुणे येथील प्रयोगशाळेत रासायनिक तपासणी सुरू आहे.
- त्वचेच्या चाचण्या:
- आजार झालेल्या रुग्णांच्या डोक्याच्या त्वचेचे बायोप्सी नमुने घेतले असून अहवाल येण्यासाठी पुढील 7 दिवस लागणार आहेत.
प्राथमिक निष्कर्ष काय सुचवतात?
- पाण्यात नायट्रेटचे प्रमाण सरासरी 10% असावे, पण प्रत्यक्षात ते 54% पेक्षा जास्त आहे.
- क्षारांचे प्रमाण 2100 असून ते फक्त सरासरी 110 पर्यंत असावे लागते.
- पाण्यातील रसायने टक्कल पडण्याचे मुख्य कारण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रुग्णांसाठी तात्काळ उपाययोजना
- या गावांतील पाणी पिण्यास टाळावे.
- पर्यायी तत्काळ स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
- वैद्यकीय सल्ला घेऊन त्वचारोग तज्ज्ञांचा मार्गदर्शन सल्ला घ्यावा.
buldhana hair loss पुढील दिशा कार्यवाही
buldhana hair loss पाठवलेल्या नामुन्याच्या अहवाला नंतरच आजाराचे मुख्य कारण समोर येईल. वैद्यकीय तज्ज्ञ आणि प्रशासन या संदर्भात सातत्याने काम करत आहेत. गावकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे.