beed election : त्या एका व्हिडिओ ने बीड च्या विधानसभा निवडणुकीवरच संशय.

beed election : २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान बीड जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर झालेल्या गोंधळाच्या घटनांवर पुन्हा एकदा वादळ उठले आहे. मतदानाच्या दिवशी समोर आलेले मतदान केंद्रांवरील तोडफोडीचे व्हिडिओ माध्यमांद्वारे प्रचंड गाजले होते. मात्र, निवडणूक आयोगाने या तक्रारींचा निपटारा करताना कुठल्याही प्रकारच्या गैरप्रकाराचा दावा फेटाळून लावल्याचे सांगण्यात आले.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
beed election

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकताच बीडमधील एका मतदान केंद्रावरील धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी “२०२४ ची विधानसभा निवडणूक मुक्त आणि निष्पक्ष होती का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ परळी विधानसभा मतदारसंघातील असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये काही तरुण मतदान केंद्रावर गोंधळ घालताना दिसत आहेत. त्यांनी मतदान केंद्रावर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना धमकावल्याचेही स्पष्ट दिसते. “फक्त उमेदवारचं आतमध्ये जाईल, बाकी कोणीही जायचं नाही,” अशा धमक्या या तरुणांनी दिल्या आहेत. तसेच, “धनंजय मुंडे साहेबांचा विजय असो,” अशा घोषणा देतानाही ते दिसत आहेत.

beed election अंजली दमानिया यांनी व्हिडिओसोबत कॅप्शन दिले आहे, “ही होती २०२४ ची विधानसभा निवडणुकीतील मुक्त आणि निष्पक्ष प्रक्रिया.” त्यांनी असेही नमूद केले की, “हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाही निवडणूक आयोगाने तो दुर्लक्षित केला.”

या घटनेनंतर विरोधकांनी निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली आहे. निवडणुकीदरम्यान अनेक ठिकाणी गोंधळ, धमक्या आणि अन्यायकारक वर्तन झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निवडणूक प्रक्रियेतील या घटनांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.

या प्रकारांमुळे बीडमधील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता या व्हिडिओवर अधिकृत चौकशी होईल का आणि निवडणूक आयोग या प्रकरणाला कितपत गांभीर्याने घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

बीड आणि परभणी घटनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाम भूमिका

1 thought on “beed election : त्या एका व्हिडिओ ने बीड च्या विधानसभा निवडणुकीवरच संशय.”

Leave a Comment