cm fadanvis beed parbhani:बीड आणि परभणी घटनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाम भूमिका: दोषींवर कठोर कारवाई आणि पीडित कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर

cm fadanvis beed parbhani: बीड आणि परभणी घटनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाम भूमिका: दोषींवर कठोर कारवाई आणि पीडित कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर

नागपूर, दि. २०: बीड आणि परभणी जिल्ह्यातील दुर्दैवी घटनांची गंभीर दखल घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली. या घटनांमध्ये पीडित कुटुंबांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत, न्यायालयीन चौकशी, तसेच दोषींवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा


बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावर मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रकरणाची न्यायालयीन आणि विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करण्यात येईल. जिल्हा पोलीस अधिक्षकांची बदली केली जाईल आणि भूमाफिया, वाळूमाफियांविरोधात मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात येईल. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

cm fadanvis beed parbhan


cm fadanvis beed parbhani परभणीतील घटनांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केला असल्याचा आरोप होत आहे. यासाठी पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांना निलंबित करून त्यांच्यावर चौकशी करण्यात येणार आहे. परभणीतील कृत्य एका मनोरूग्णाने केल्याचा वैद्यकीय अहवाल आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले.


परभणीतील दंगलीमध्ये नुकसान झालेल्या दुकान, वाहन आणि सरकारी कार्यालयांच्या बाबतीत तातडीने उपाययोजना केल्या जातील. ही घटना हिंदू विरुद्ध दलित संघर्ष नव्हे, तर सामाजिक तणाव कमी करण्यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


बीड येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.


cm fadanvis beed parbhani मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, गुन्हेगारी आणि अपप्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. बीड आणि परभणीतील घटनांमुळे निर्माण झालेल्या तणावाला संपवण्यासाठी आणि समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

पहा सभागृहात काय म्हणाले मुख्यमंत्री.

2 thoughts on “cm fadanvis beed parbhani:बीड आणि परभणी घटनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाम भूमिका: दोषींवर कठोर कारवाई आणि पीडित कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर”

Leave a Comment