राज्यातील शेतकऱ्यांना 365 दिवस 24 तास मोफत वीज राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी आता विज बिल माफी व शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा याबाबतची घोषणा करण्यात आली व शासनाकडून त्याबद्दलचा जीआर देखील प्रसिद्ध करण्यात आला यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना 365 दिवस 24 तास मोफत वीज पुरवठा करणार असल्याची घोषणा केली यामध्ये नेमकी शेतकऱ्यांना कशी वीज दिली जाणार याबद्दलची माहिती पाहूया.
कापूस सोयाबीन अनुदान जमा होण्यास सुरवात
365 दिवस 24 तास मोफत वीज
महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी 365 दिवस 24 तास वीज देण्याची घोषणा केली यामध्ये राज्य शासन पुढील दोन वर्षात हरित ऊर्जा मधून तसेच सौर ऊर्जेचे मार्फत शेतकऱ्यांना मोफत वीज देणार आहे यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊन विज बिल आतून देखील सुटका केली जाणार आहे याबद्दल एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले त्याच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचे मार्फत दिवसा मोफत वीज दिले जाणार आहे या सौर ऊर्जेच्या मार्फत माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारी 16000 मेघा वॅट विज लागते त्यापैकी राज्य शासन पुढील दोन वर्षात शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेच्या मार्फत 12000 मेघा वॅट वीज निर्माण करण्याचं काम सुरू असल्याचं सांगण्यात आलं.