राज्यमाता-गोमाता हिंदू धर्मात गाईला अत्यंत मूल्यवान समजले जाते, यातच राज्य शासनाने दिनांक 30 सप्टेंबर रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून देशी गाईंना राज्यमाता गोमाता याबाबत घोषित करण्याचा अधिकृत निर्णय देण्यात आलेला आहे.
प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये गाईचे खूप महत्त्व आहे यात वैदिक काळापासून गाईचे धार्मिक वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व विचारात घेऊन पूर्वी यांना कामधेनू असे संबोधण्यात येत होत्या राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या जातीच्या गाई आढळतात परंतु सद्यस्थितीमध्ये दिवसेंदिवस देशी गाईंचे संकेत घट होता दिसत आहे यामुळे शासनाने याबाबत नियोजन व पुढील प्रक्रिया राबवण्या संबंधित शासन निर्णय निर्गमित केला आहे.
देशी गाईच्या दुधाने मानवी आहारात पौष्टिक दृष्ट्या अधिक मूल्यवान आहे देशी गाईच्या दुधात मानवी शरीरासाठी पोषक असणारे अन्नघटक उपलब्ध असल्याने ते पूर्ण अन्न आहे असे वैज्ञानिक दृष्ट्या सांगण्यात येते. देशी गाय दुधाचे मानवी आहारातील स्थान आयुर्वेद चिकित्सा पद्धतीत पंचकव्याचा वापर तसेच सेंद्रिय शेती पद्धतीचे महत्त्व विचारात घेता; देशी गाईंच्या संख्येत होणारी घट ही बाब चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे, यावर उपाययोजना करून पशुपालकांना देशी गाईचे पालन पोषण करण्यास प्रेरित व प्रोस्थाहण करण्याच्या दृष्टीने देशी गाईस राज्यमाता-गोमाता घोषित करण्याची बाब शासनाच्या विचारात होती यावर शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून यावर घोषणा केली आहे.
राज्यमाता-गोमाता काय आहे शासन निर्णय.
देशी गाईचे भारतीय संस्कृतीमध्ये पूर्व काळापासूनच असलेल्या महत्त्वपूर्ण स्थान लक्षात घेता देशी गाईच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता मानवी आहारामध्ये देशी गाईंचे दूध अत्यंत महत्त्वाचे मानले जाते तसेच सेंद्रिय शेती असेल आयुर्वेद असेल या घटकासाठी देखील गाईचे गोमुत्र तसेच शेण याचे अत्यंत महत्त्व मानले जाते तसे ते उपयुक्तही ठरत आहे या गोष्टीचा विचार करून गाईंना यापुढे राज्यात राजमाता गोमाता म्हणून घोषित करण्याबाबतची शासन मान्यता देण्यात आलेली आहे.