मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा तसेच आवश्यक असणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी शासनाकडून मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना त्यांना लागणाऱ्या वस्तू ज्यामध्ये चष्मा काठी पुढची अशा प्रकारच्या विविध वस्तू खरेदी करण्यासाठी सरकारकडून त्यांना तीन हजार रुपये एक रकमी लाभ दिला जाणार आहे यामध्ये पात्रता तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्दलची माहिती खाली दिलेली आहे
मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज पात्रता
अर्जदार लाभार्थी महाराष्ट्र राज्यचा रहिवाशी असणे आवश्यक आहे, यासोबतच अर्जदार व्यक्तीने वयाची 65 वर्ष पूर्ण केलेली असावे. अर्जदार व्यक्तीकडे स्वतःचे ओळखपत्र ज्यामध्ये जन्माचा पुरावा असणे आवश्यक आहे. त्यासोबतच अर्जदार व्यक्तीचे बँक खाते त्याच्या आधार कार्डशी लिंक असणेही आवश्यक आहे. यासोबत ज्या नागरिकांनी याआधी एखाद्या योजनेतून लाभ घेतला आहे त्या अर्जदाराला या योजनेतून लाभ दिला जाणार नाही हाही महत्त्वाचा मुद्दा आहे.
अर्ज कोठे करावा
मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज याकरिता शासनाकडून कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पोर्टल सध्या तरी लॉन्च करण्यात आलेले नाही, परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हा अर्ज अर्जदाराने आपल्या जवळील समाज कल्याण कार्यालयात सर्व कागदपत्रे तसेच त्यासोबतचे आवश्यक असणारी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. हा अर्ज सादर केल्यानंतर अर्जदाराला कार्यालयातून पोहोच पावती वितरित केली जाते.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- पासपोर्ट फोटो
- बँक खाते पासबुक
- वैद्यकीय अधिकाऱ्याने आवश्यक असणाऱ्या घटकाबाबतचे दिलेले प्रमाणपत्र
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा