सोयाबीन अनुदान जमा राज्य सरकारने राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावंतर योजने अंतर्गत हेक्टरी 5000 रुपये अनुदान 2 हेक्टर च्या मर्यादेत देण्याची घोषणा केली या मध्ये सरकार कडून शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी पोर्टल लॉंच केले या पोर्टल वर ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये ई पीक पाहणी केली आहे अश्या शेतकऱ्यांची नावे त्या त्या पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. पोर्टल वर नाव असणाऱ्या शेतकऱ्यांची kyc करणे आवश्यक आहे. कृषि सहाय्यक यांच्या कडून या शेतकऱ्यांची kyc पूर्ण केली जाणार आहे.
पिक नुकसान तक्रार कधी व कोठे करावी.
kyc पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना आपले आधार सहमति पत्र व आधार कार्ड झेरॉक्स जमा करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्याची kyc पूर्ण झाली आहे त्या शेतकऱ्यांची रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे. शासनाच्या सूचनेनुसार kyc पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना 10 सप्टेंबर नंतर रक्कम वितरित केली जाणार आहे. या निर्णयाचे पालन करत शेतकऱ्यांना अनुदान जमा करण्यास सुरवात झाली आहे.
1 thought on “कापूस सोयाबीन अनुदान जमा होण्यास सुरवात”