शेतकऱ्यांना मिळणर कडबा कुट्टि अनुदान

By md news

कडबा कुट्टि अनुदान: शेतकऱ्यांची हितासाठी व शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी सरकारकडून नेहमी काही ना काही आर्थिक मदत देण्याची संकल्पना राबवली जाते यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी याकरिता विविध यांत्रिकीकरण वितरित केले जाते किंवा त्या यांत्रिकीकरण खरेदीसाठी अनुदान दिले जाते यातच शासनाकडून आता शेतकऱ्यांना कडबा कुट्टी यंत्र खरेदीसाठी अनुदान वितरित केला जाणार आहे यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे ज्या शेतकऱ्यांना कडबाकुट्टी योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी या पोर्टल वर जाऊन आपला अर्ज सादर करणे आवश्यक आहे

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

ज्या शेतकऱ्यांना महाडीबीटी योजनेअंतर्गत कडबा कुट्टी योजनेचा लाभ घ्यायचा आहे या शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी आपले कागदपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचे आधार कार्ड शेतकऱ्याचे जमिनीचे कागदपत्र सातबारा आठ बँक पासबुक मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रे आवश्यक लागतात अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याच्या आधार क्रमांकाला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

कडबा कुट्टि अनुदान अर्ज कोठे करावा

ज्या शेतकऱ्यांना कडबा कुट्टी योजना अंतर्गत अर्ज करायचा आहे त्या शेतकऱ्यांनी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या संकेतस्थळावर आपला अर्ज सादर करणे आवश्यक आहे अर्ज केल्यानंतर अर्जासाठी जे शुल्क आकारले जाते ते शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे शुल्क भरल्यानंतरच शेतकऱ्यांना या योजनेच्या लॉटरी पद्धतीमध्ये समाविष्ट केले जाईल

Leave a Comment