www.malharcertification.com मल्हार प्रमाणपत्र म्हणजे काय?

www.malharcertification.com मल्हार प्रमाणपत्र म्हणजे काय? महाराष्ट्र राज्य सरकार ने हिंदू समाजातील खटीकांना एक प्रमाणपत्र देण्यासाठी धोरण आखले आहे. या प्रमानपत्राचे नाव मल्हार प्रमाणपत्र असे आहे. मल्हार प्रमाणपत्र हे कोणासाठी असणार त्याचे वैशिष्ट आणि कार्य कसे असणार आणि ते कसे मिळवता येते याची सर्व माहिती आजच्या लेखातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.

www.malharcertification.com

राज्यातील मटन दुकानदारांना मल्हार प्रमाणपत्र देण्याचा निर्धार राज्याचे मात्सोद्योग आणि बंदरे विकास मंत्री मा. नितेश राणे यांनी घेतला आहे. मल्हार प्रमाणपत्र च्या माध्यमातून हिंदू समाजातील खाटीकांना हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी मल्हार प्रमाणपत्र नसेल अश्या ठिकाणी आपण मास मटन खरेदी करू नये अशी माहिती देखील मात्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मल्हार प्रमाणपत्र म्हणजे काय?

महाराष्ट्र सरकारच्या नवीन धोरण नुसार राज्याच्या मत्स्य व्यवसाय मंत्री नितीश राणे यांनी दिनांक 10 मार्च रोजी राज्यात मल्हार प्रमाण नावाचा नवीन उपक्रम सुरू केला . महाराष्ट्र राज्यातील झटका मांस दुकानांसाठी हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील या सर्व मांस मटन दुकानांची नोंदणी मल्हार प्रमाणपत्रा मध्ये केली जाणार आहे. मल्हार प्रमाणपत्र नोंदणी झाल्यानंतर या सर्व दुकानांना मल्हार प्रमाणपत्र दिले जाईल.

या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व मासमटनांची दुकाने हिंदू धर्मातील लोक चालवतील. राज्यातील सर्व झटका मटण आणि चिकन विक्रेत्यांच्या नोदणीं साठी सरकार नवीन पोर्टल सुरु करणार आहे. राज्यातील सर्व नोंदणीकृती मांस विक्रेत्यांना ‘मल्हार प्रमाणपत्र’ वितरित केल जाणार आहे.

मल्हार प्रमाणपत्रा नुसार, राज्यातील मटण विकणारी दुकाने नोंदणीकृत असतील. या दुकानांचे प्रमाणपत्र फक्त हिंदूं खटीकांना दिले जाईल. नितेश राणे यांनी लोकांना सांगितले आहे की, राज्यातील ज्या दुकानांमध्ये मल्हार प्रमाणपत्र उपलब्ध असेल त्याच नोंदणीकृत दुकानातूनच नागरिकांनी मांस विकत घ्यावे. या मटण दुकानांमध्ये कोणतीही भेसळ केली जाणार नाही आणि ती फक्त हिंदूं लोकांकडून चालवली जातील. सरकारच्या या मोहिमेद्वारे हिंदू तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, असं देखील नितेश राणे यांनी या वेळी म्हटलं आहे.

मल्हार प्रमाणपत्र कोणाला मिळेल

मल्हार प्रमाणपत्रासाठी www.malharcertification.com हे नवे पोर्टल सरकार कडून महाराष्ट्रातील झटका मांस दुकान मालकांसाठी सुरू करण्यात आलेले आहे. या अंतर्गत हिंदू मांस व्यापाऱ्यांना मल्हार प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. यासाठी तुम्हाला www.malharcertification.com या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. यानंतर मल्हार प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

www.malharcertification.com

मल्हार प्रमाणपत्र हलाल प्रमाणपत्र प्रमाणेच

मल्हार प्रमाणपत्राद्वारे हिंदू समुदायांकडून पारंपरिक पद्धती वापरून मांस विकले जाणार आहे. एक प्रकारे, हे प्रमाणपत्र हलाल प्रमाणपत्रा प्रमाणे काम करणार . हलाल सर्टिफिकेशनमध्ये मांस आणि इतर गोष्टी इस्लामिक कायद्यानुसार तयार केले जातात. त्याचप्रमाणे मल्हार प्रमाणपत्राद्वारे मांस तयार करून विकले जाणार आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी याबाबत वाद देखील सुरू आहेत.

हिंदू आणि शीखां धर्मासाठी हलाल नसलेले मांस उपलब्ध करून देणे. तसेच हिंदू धार्मिक परंपरेनुसार बकरी आणि मेंढीचे ताजे, स्वच्छ आणि इतर कोणत्याही प्राण्यांच्या मांसात मिसळलेले नसावे याची खात्री करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. या अंतर्गत विकले जाणारे हे मांस केवळ हिंदू खाटीक समुदायाच्या विक्रेत्यांकडून उपलब्ध केलेले असेल.

मल्हार प्रमाणपत्र नुसार राज्यातील हिंदू धर्मातील परंपरेनुसार मास व मटन उपलब्ध करून देणे. ज्या मटन दुकांनावर मल्हार प्रमापत्र असेल त्या दुकानांची पूर्ण तपासणी करून त्या दुकानदारांना हे प्रमापत्र वितरित केले जाते.

बियर बार लायसन्स महाराष्ट्र कसे मिळवावे

1 thought on “www.malharcertification.com मल्हार प्रमाणपत्र म्हणजे काय?”

Leave a Comment