jyoti malhotra हरियाणातील प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी जासूसी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ती दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगात कार्यरत असलेल्या एहसान-उर-रहीम उर्फ दानिश या कर्मचाऱ्याच्या संपर्कात होती. दानिशने तिला डिनरला बोलावले होते आणि त्यावेळी दोघांनी एकत्र व्हिडिओ शूट केला होता. याच दरम्यान तिला पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांशीही भेट घडवून देण्यात आली.

jyoti malhotra ज्योतीने ‘जट्ट रंधावा’ या नावाने सेव केलेल्या PIO शाकीर उर्फ राणा शहबाज याच्याशी ती WhatsApp, Telegram आणि Snapchat सारख्या एन्क्रिप्टेड अॅप्सवरून सातत्याने संपर्कात होती. या प्रकरणात तिच्यावर भारतीय दंड संहिता (BNS) कलम 152 आणि ऑफिसियल सीक्रेट्स अॅक्ट 1923 अंतर्गत कलम 3, 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिचा लिखित कबुलीजबाब घेतला असून प्रकरणाची तपासणी हिसारच्या इकोनॉमिक ऑफेन्सेस विंगकडे सोपवण्यात आली आहे.
ज्योती मल्होत्रा (jyoti malhotra) ‘Travel with Jo’ नावाच्या यूट्यूब चॅनलची मालक आहे, जिथे तिचे सुमारे 3.77 लाख सब्स्क्रायबर आहेत. तिच्या Instagram अकाऊंटवरही 1.32 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या सोशल मीडिया खात्यांवरून ती भारतासह अनेक विदेशी देशांना भेट दिल्याचे दिसून येते. विशेषतः पाकिस्तानचा दौरा अधिक संशयास्पद मानला जात आहे. त्या दौऱ्यात तिने लाहोरच्या अनारकली बाजार, कटासराज मंदिर आणि वाघा सीमेवरील व्हिडिओ शेअर केले होते.
तपास संस्थांच्या मते, सोशल मीडियावरील प्रभाव पाहून पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांनी तिचा वापर भारताविरोधात प्रचार आणि माहिती मिळवण्यासाठी केला. या प्रकरणात ज्योतीसह (jyoti malhotra) आणखी सहा जणांची अटक करण्यात आली असून त्यांच्यावर संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या एजंटांशी शेअर केल्याचा आरोप आहे.
पंजाबमधील मलेरकोटला येथून गझाला आणि यामीन मोहम्मद या दोन जणांना अटक झाली असून त्यांनी दानिशला आर्थिक व्यवहार आणि वीजा प्रक्रियेत मदत केल्याचे समोर आले आहे. हरियाणातील कैथलमधून देविंदर सिंह ढिल्लों याला अटक झाली असून त्याने पाकिस्तान दौऱ्यातून परतल्यानंतर भारतीय लष्कराच्या ठिकाणाचे व्हिडिओ पाक एजंटांना दिल्याचा आरोप आहे. नूंह येथील अरमान नावाच्या युवकाने भारतीय सिम कार्ड पुरवले आणि तो फंड ट्रान्सफर व डिफेन्स एक्स्पो 2025 च्या साइटपर्यंत पोहोचल्याचेही निष्पन्न झाले आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास अजून सुरू असून सुरक्षा यंत्रणा या जाळ्यातील अन्य दुव्यांचा शोध घेत आहेत. ज्योती मल्होत्राची अटक म्हणजे भारतातील मोठ्या जासूसी नेटवर्कचा भाग असल्याचा संशय आता बळावत चालला आहे.