waras nond : वारस नोंदी होणार आता ऑनलाईनच ! तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.

waras nond मित्रांनो, जर आपल्या घरातल्या कुणाच्या नावावर शेतजमीन असेल आणि त्या व्यक्तीचं निधन झालं असेल, तर पुढे काय करायचं, ही चिंता आपल्याला लागून राहते. पूर्वी अशा वेळी तलाठ्याच्या ऑफिसात जावं लागायचं, वेळ वाया जायचा, कधी फाईल सापडायची नाही, तर कधी कुणी काही सांगायचं नाही. पण आता काळ बदललाय. महाराष्ट्र सरकारने ‘ई-हक्क’ नावाचं एक ऑनलाइन पोर्टल सुरू केलंय, ज्यातून घरबसल्या जमिनीच्या वारस नोंदणीचा अर्ज करता येतो.

waras nond अर्ज कधी करायचा ?

मालकाचं निधन झाल्यावर ३ महिन्यांच्या आत अर्ज करणं गरजेचं आहे. जर आपण वेळेत अर्ज केला नाही, तर नंतर नाव लावताना अडचणी येऊ शकतात. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. मृत्यू झाल्यावर 3 महिन्याचा आत वारस नोंद करणे आवश्यक असते.

ई-हक्क पोर्टल म्हणजे काय

ई-हक्क पोर्टल हे पोर्टल केवळ वारस नोंदणीसाठीच नाही. इथे अजून बरंच काही करता येतं:

  • नाव दुरुस्ती
  • कर्ज किंवा बोजा नोंद
  • ई-करार
  • आणि अर्ज कुठे पोहोचला, हे पाहणं

हे सगळं अगदी सोप्या पद्धतीनं मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर करता येतं.

अर्ज कसा करायचा ते बघूया

Step 1: पोर्टलवर जाऊन नाव नोंदवा

  • https://pdeigr.maharashtra.gov.in या लिंकवर क्लिक करा.
  • ‘Proceed to Login’ वर क्लिक करा, मग ‘Create new user’ वर क्लिक करा.
  • नाव, मोबाईल नंबर, गाव, जिल्हा, पत्ता वगैरे भरून खाते तयार करा.

Step 2: लॉग-इन करा आणि अर्ज सुरू करा

  • आता तुमचं यूझरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग-इन करा.
  • ‘7/12 Mutations’ या पर्यायावर क्लिक करा.
  • ‘Citizen’ निवडा आणि ‘Process’ वर क्लिक करा.
  • त्यात ‘वारस नोंद’ हा पर्याय निवडा.

Step 3: अर्ज भरणं सुरू करा

  • मृत व्यक्तीचं नाव, खाते क्रमांक, गट क्रमांक आणि मृत्यूची तारीख भरा.
  • त्यानंतर ‘वारसांची नावे’ टॅबमध्ये प्रत्येक वारसाची माहिती भरून ठेवा.

Step 4: लागणारी कागदपत्रं अपलोड करा

  • मृत्यूचा दाखला
  • 8अ उतारा
  • रेशन कार्ड

या सगळ्याचे फोटो काढा किंवा स्कॅन करून अपलोड करा.

Step 5: अर्ज सबमिट करा

  • सगळी माहिती नीट भरून झाल्यावर अर्ज सबमिट करा.
  • १७ व्या दिवशी अर्ज मंडल ऑफिसात पोहोचतो आणि १८ व्या दिवशी नोंद पूर्ण होते.

निष्कर्ष

पूर्वी जमिनीच्या नोंदणीसाठी शासकीय कार्यालयांची दारं झडावी लागायची. पण आता सरकारनं तुमच्यासाठी ‘ई-हक्क’ ही सोपी आणि घरबसल्या करता येणारी पद्धत दिलीय. ही सोय वापरून तुमच्या नावावर जमीन लवकर आणि सोप्या मार्गानं करून घ्या. वेळ वाचवा, पैसाही वाचवा… आणि त्रास तर नाहीच नाही.

Leave a Comment