sucess story : पुरुषोत्तम कोकरे यांची ‘उपजिल्हाधिकारी’ पदावर निवड

sucess story तिरकवाडी सारख्या छोट्याशा गावातून ‘उपजिल्हाधिकारी’ पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास करणारे पुरुषोत्तम कोकरे हे तरुणांसाठी आशेचे आणि जिद्दीचे प्रतीक ठरले आहेत. घरची साधी पार्श्वभूमी, नोकरी सांभाळून केलेला अभ्यास, आणि संयम-शिस्त यांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलं. त्यांच्या या विजयामुळे तिरकवाडी गाव पुन्हा एकदा अधिकाऱ्यांच्या परंपरेत उजळून निघालं आहे. पुरुषोत्तम कोकरे यांची यशोगाथा म्हणजे मेहनत आणि चिकाटीने कोणतंही स्वप्न सत्यात उतरू शकतं, याचा जिवंत पुरावा आहे.

sucess story सातत्यपूर्ण अभ्यास, कष्ट आणि संयम यामुळे कोणतीही अडथळ्यांची शर्यत पार करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे फलटण तालुक्यातील तिरकवाडी येथील पुरुषोत्तम दादासाहेब कोकरे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा 2022 परीक्षेमध्ये त्यांनी ‘उपजिल्हाधिकारी’ पदावर घवघवीत यश मिळवले आहे. केवळ बाराशे लोकसंख्या असलेल्या एका छोट्याशा गावातून ‘उपजिल्हाधिकारी’ पदापर्यंतचा प्रवास करणे हे निश्चितच प्रेरणादायी आहे.

तिरकवाडी – अधिकाऱ्यांचे गाव

या यशामुळे तिरकवाडी गाव पुन्हा एकदा अधिकाऱ्यांचे गाव म्हणून प्रकाशझोतात आले आहे. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरांनी समृद्ध असलेल्या या गावातील 50 हून अधिक युवक सध्या महसूल, गृह, पोलीस व सैन्य विभागात तसेच केंद्र शासनाच्या विविध सेवांमध्ये जबाबदारी पार पाडत आहेत.

शैक्षणिक प्रवास आणि सेवाभिमान sucess story

पुरुषोत्तम कोकरे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा तिरकवाडी येथे, माध्यमिक शिक्षण जय भवानी हायस्कूलमध्ये, उच्च माध्यमिक शिक्षण मुधोजी कॉलेज फलटण येथे आणि इंजिनीअरिंग शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, सातारा येथे झाले. 2012 मध्ये त्यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून सीआयडीमध्ये निवड झाली. सध्या ते राज्य उत्पादन शुल्क विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

घराची साथ आणि प्रेरणा

त्यांचे वडील दादासाहेब कोकरे हे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या आई सिंधुताई कोकरे यांचे एक वर्षांपूर्वी निधन झाले आहे. मोठे बंधू रमेश कोकरे हे सध्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी म्हणून रायगड जिल्ह्यात कार्यरत आहेत. अशा सशक्त पार्श्वभूमीने पुरुषोत्तम यांचा यशाचा मार्ग अधिक सुकर झाला.

यशाचं गमक – संयम आणि सातत्य

आपल्या यशाबाबत बोलताना पुरुषोत्तम कोकरे म्हणतात, “सध्या मी पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करत असून, नोकरी सांभाळून अभ्यास करत होतो. सातत्यपूर्ण अभ्यास आणि संयम या दोन गोष्टींचे मी यशाचे श्रेय देतो. नव्या विद्यार्थ्यांनी परिस्थितीची जाण ठेवून जिद्दीने मेहनत घेतली तर यश निश्चित आहे.”

sucess story त्यांच्या या यशामुळे तिरकवाडी गावात आनंदाचे वातावरण असून विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. पुरुषोत्तम कोकरे हे तरुणांसाठी एक आदर्श ठरले आहेत, ज्यांच्या यशकथेने अनेकांना प्रेरणा मिळणार आहे.

Leave a Comment