srh vs mi: कोण मारणार बाजी? हैदराबाद समोर एक मोठे आव्हान!!

srh vs mi: दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना होणार आहे. अतिशय रंगतदार असा हा सामना पाहायला मिळू शकतो. हैदराबाद येथील प्रसिद्ध राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना पूर्ण होणार आहे.

srh vs mi संघाची सद्यस्थिती

मुंबई इंडियन : मुंबई इंडियन्स टीम कडून आतापर्यंत एकूण आठ सामने खेळले गेले आहेत. या आठ सामन्यापैकी चार सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सला विजय मिळाला आहे तर चार सामन्यांमध्ये पराभव देखील मिळाला आहे. सुरुवातीच्या अपयशानंतर मुंबई इंडियन्सने सलग तीन मॅच जिंकण्याचा विक्रम केला आहे. मुंबई इंडियन्सला यापुढे प्ले ऑफ मध्ये येण्यासाठी सर्वसामान्य जिंकणे देखील महत्त्वाचे असणार आहे. या जिंकत आलेल्या सामन्याला मुंबई इंडियन्स टीम परत विजयाच्या वाटेवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना दिसून येणार आहे. मुंबई इंडियन्सचा मुख्य खेळाडू असणारा रोहित शर्मा परत मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाल्याचा मागच्या सामन्यांमध्ये पाहायला मिळाला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सनरायझर्स हैदराबाद: सनरायझर्स हैदराबाद कडून एकूण सात सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी सनरायझर्स हैदराबादला फक्त दोन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. आणि पाच सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादचा पराभव देखील झालेला आहे. एका सामन्यात सर्वच टीमला धडकी भरवणारा हा संघ याला विजयाच्या शोधात भरकटत फिरावे लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. पॉइंट टेबल मध्ये देखील सनरायझर्स हैदराबाद 9 नंबर वर पाहायला मिळत आहे. प्ले ऑफ मध्ये समाविष्ट होण्यासाठी या संघाला देखील प्रत्येक सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एका मॅच मध्ये आयपीएल मधील सर्वाधिक स्कोर करणारी टीम आज विजयाच्या शोधात फिरताना पाहायला मिळत आहे. टीम मध्ये अत्यंत महान खेळाडूंचा समावेश असून देखील त्यांना आपले कौशल्य खेळामध्ये दाखवण्यास विविध अडचणी येत आहे.

हे पण वाचा:
hakka sod patra hakka sod patra : हक्क सोड प्रमाणपत्र म्हणजे काय?

Mi vs srh सामना

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये 41 व आयपीएलचा सामना खेळला जाणार आहे. सामना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये खेळला जाणार आहे. या ग्राउंड च विषय केल्यास पहिल्या गावामध्ये चांगल्या धावा झाल्याच्या पाहायला मिळालेले आहेत. या ग्राउंडवर सरासरी 200 प्लस चा स्कोर पाहायला मिळत आहे. दुसऱ्या युनिंग मध्ये स्पिनर्स ना अधिक मदत मिळालेली देखील या ग्राउंडवर पाहायला मिळालेले आहे. या ग्राउंड वर झालेल्या चार सामन्यापैकी तीन सामने हे पहिल्यांदी फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.

srh vs mi आमने सामने झालेले खेळ H2H

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये आतापर्यंत एकूण 24 सामने झाले आहेत. या 24 सामन्यापैकी सनरायझर्स हैदराबादला एकूण दहा सामने जिंकता आलेले आहेत. तर मुंबई इंडियन्सने एकूण 13 सामने जिंकलेले आहे. तर एक सामना टाय झालेला आहे. हेड टू हेडच्या रेकॉर्डनुसार मुंबई संघाने या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी केल्याचे पाहायला मिळत आहे.

srh vs mi आजचे संभाव्य खेळाडू playing 11

मुंबई इंडियन्स : (mi playing 11) रायन रिकेल्टन (wk), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, अश्वनी कुमार
इम्पॅक्ट प्लेअर: रोहित शर्मा

हे पण वाचा:
sucess story sucess story : पुरुषोत्तम कोकरे यांची ‘उपजिल्हाधिकारी’ पदावर निवड

सनरायझर्स हैदराबाद (srh playing 11)

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (wk), अनीकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, झीशान अन्सारी, मोहम्मद शमी, ईशान मालिंगा
इम्पॅक्ट प्लेअर: राहुल चहर

srh vs mi

हे पण वाचा:
tushar deshpande tushar deshpande: तुषार देशपांडेचा सलामीवीराला सॅल्यूट, पंजाब किंग्सचा डाव सुरूवातीलाच कोसळला!

Leave a Comment