Shasan nirnay 2.0 शासनाने निर्गमित केलेल्या सूचना, आदेश आणि नियमावली अधिकृतपणे नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक शासकीय घोषणेची आणि निर्णयाची अंमलबजावणी कशा स्वरूपात होईल याची सविस्तर माहिती देणारा दस्तऐवज म्हणजेच शासन निर्णय. शासन निर्णयाच्या माध्यमातून सरकारकडून शिक्षण, शेती, महसूल,महिला बालविकास विभाग, ग्रामविकास विभाग, सहकार इत्यादी सर्व विभागांची माहिती शासन निर्णयाच्या माध्यमातून नागरिकापर्यंत पोहोचवली जाते.

सरकारने तयार केलेले शासन निर्णय अनेक ठिकाणी उपयोगी पडतात. ज्यामध्ये सरकारी आणि वैयक्तिक कामासाठी शासन निर्णय उपयोगी पडतात. त्यासोबतच शैक्षणिक प्रक्रियेसाठी नोकरीसाठी लागणारे कागदपत्रे शेतकऱ्यांच्या तसेच नागरिकांच्या संबंधित शासकीय योजनांची अधिसूचना कायदेशीर बाबींची पूर्तता करणारे दस्तऐवज म्हणून शासन निर्णयाचा वापर केला जातो.
प्रत्येक शासन निर्णय सांभाळून ठेवणे शक्य नाही. यामुळे प्रत्यक्ष शासन निर्णय हा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी नवीन संकेतस्थळ निर्माण केले आहे. या शासन निर्णयासंबंधी सरकारने आता नवीन संकेतस्थळ उपलब्ध केले आहे. यादी शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत होते. यामध्ये नागरिकांना सविस्तरपणे आणि सोप्या पद्धतीने शासन निर्णय मिळवता यावा अशा प्रकारचे नवीन डिझाईन तयार करण्यात आले आहे. यानुसार शासन निर्णय 2.0 चे अंतर्गत शासन निर्णयाची संकेतस्थळ अपडेट करण्यात आले आहे.
याआधी आपण ज्या प्रकारे शासन निर्णय पाहत होतो त्यामध्ये थोड्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. वापर करताना सहज आणि सोप्या पद्धतीने शासनाने निर्णय उपलब्ध करता यावा व डाऊनलोड करता यावा यासाठी सुविधा देण्यात आली आहे. नवीन शासन निर्णय संकेतस्थळाला आता अपडेट करण्यात आले आहे. या अपडेट नुसार वापर करताना आता शासन निर्णय पोर्टल अधिक सुलभ पद्धतीने वापरता येणार आहे.
शासन निर्णय 2.0 कसे वापरावे
- सर्वप्रथम संकेतस्थळावर जा – https://gr.maharashtra.gov.in
- वरती तुम्हाला दिनांक आणि वेळ दाखवली जाईल.
- मुख्यपृष्ठावर “शासन निर्णय पाहा” किंवा “View G.R.” यावर क्लिक करा.
- तुम्हाला विभाग निवडायचा आहे (उदा. कृषी विभाग, शिक्षण विभाग, महिला बालविकास विभाग).
- शासन निर्णयाचं शीर्षक किंवा महत्त्वाचा शब्द टाका. (उदा. प्रधानमंत्री पीक विमा, जलजीवन मिशन इत्यादी)
- दिनांक निवडा – कोणत्या कालावधीतील जीआर हवाय ते.
- जीआर क्रमांक माहीत असल्यास, तो सुद्धा टाका.
- खाली दिलेला कॅप्चा कोड भरून “शोधा” या बटणावर क्लिक करा.
शासन निर्णय डाउनलोड किंवा प्रिंट कसा करायचा?
शासन निर्णय 2.0 शोधल्यानंतर संबंधित जीआर पीडीएफ स्वरूपात आपल्या समोर उपलब्ध होईल:
- “PDF” वर क्लिक करा – जीआर ची पीडीएफ उघडेल
- पाहण्यासाठी फक्त ब्राउझरमध्ये संपूर्ण वाचता येईल.
- डाउनलोड करण्यासाठी “Download” वर क्लिक करा आणि पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करा.
- प्रिंट हवी असल्यास “Print” वर क्लिक करा आणि प्रिंट काढून घ्या.
शासन निर्णय शोधताना महत्वाच्या टीप
- जर तुम्हाला विशिष्ट शासन निर्णय हवा असेल, तर अधिकाधिक अचूक माहिती द्या – विभाग, शीर्षक, दिनांक, कीवर्ड. ही सर्व माहिती व्यवस्थित भरा.
- फक्त सामान्य कीवर्ड (जसे “शेती”, “शिष्यवृत्ती”) टाकून देखील शोध करता येतो.
- नवीन शासन निर्णय पाहायचे असतील, तर खाली विभागानुसार आणि तारखेनुसार सर्व शासन निर्णयाची यादी दिलेली असते त्या वरुण तुम्हाला हवा असणारा शासन निर्णय आपण पाहू किंवा डाउनलोड करू शकता.
माहिती मिळवण्याचा अधिकृत स्त्रोत
शासन निर्णय शोधण्यासाठी आता कोणत्याही अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला, पत्रकाराला किंवा एजंटला विचारण्याची गरज पडत नाही. फक्त शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा आणि आवश्यक तो शासन निर्णय डाऊनलोड करा आणि शासन निर्णय 2.0 निर्णयाच्या मदतीने अधिकृत माहिती मिळवा.
Shasan nirnay 2.0 मोबाईलवर सुद्धा सहज वापर करता येतो
शासन निर्णय पाहण्याची ही संपूर्ण प्रक्रिया आपल्या मोबाईलवर सुद्धा करता येते. त्यामुळे कोणताही शासन निर्णय अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने मिळवू शकता. या नवीन संकेतस्थळ वरुण आपण हव्या त्या वेळी हव्या त्या ठिकाणी शासन निर्णय मिळवू शकता.