sanjay gandhi niradhar yojana शासनाने स्पष्ट केलं आहे की, ही दोन्ही कागदपत्रं तहसील कार्यालयात सादर केल्याशिवाय पुढील हप्ते मिळणार नाहीत. विशेषतः 65 वर्षांहून अधिक वयाच्या लाभार्थ्यांनी मुलांपासून वेगळं राहत असल्याचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे. तर दरवर्षी एप्रिल ते जूनदरम्यान हयातीचा दाखला सादर करणं अनिवार्य आहे. त्यामुळे शेतकरी, विधवा, अपंग, निराधार व्यक्तींनो – वेळेत कृती करा, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात!

राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे हजारो लाभार्थी सध्या अत्यंत चिंतेत आहेत. कारण, शासनाने काही नव्या अटी लागू करत, पुढील हप्ता मिळवण्यासाठी 2 महत्त्वाच्या कागदपत्रांची मागणी केली आहे. या नव्या अटींची माहिती वेळेवर न मिळाल्यामुळे अनेकांचे पैसे अडकले असून, शासनाच्या निर्णयावर आधारित स्पष्ट गाईडलाइन आता समोर आली आहे. चला तर मग पाहूया, या दोन नव्या गाईडलाइन म्हणजे काय, आणि त्या वेळेत पूर्ण केल्या नाहीत तर तुमचं नुकसान कसं होणार?
लाभार्थ्यांना माहिती उशिरा मिळते – त्यामुळे पैसे अडकतात!
संजय गांधी निराधार योजनेतून दर महिन्याला राज्यातील विधवा, अपंग, अनाथ, निराधार व्यक्तींना मदतीचा भत्ता दिला जातो. परंतु ही योजना लाभार्थ्यांपर्यंत नीट पोहोचत नाही, कारण:बरेच लाभार्थी अशिक्षित असतात माहिती गाव पातळीपर्यंत उशिरा पोहोचते. शासनाचे आदेश लोक गांभीर्याने घेत नाहीत. याच कारणांमुळे शासनाने DBT (Direct Benefit Transfer) अॅक्टिव्ह करण्यास सांगितले तरी अनेकांनी ते केले नाही. परिणामी, त्यांचे हप्त्याचे पैसे अडकले.
DBT अॅक्टिव्ह केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत!
सरकारने आधीच स्पष्ट केलं आहे की, जर DBT अॅक्टिव्ह केलेलं नसेल, तर शासकीय खाते थेट तुमच्या बँकेत पैसे ट्रान्सफर करणार नाही.ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 मध्ये सूचना देण्यात आल्या पण अनेकांनी दुर्लक्ष केल आता ज्यांनी DBT अॅक्टिव्ह केलं आहे, त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरच पैसे मिळतील, पण त्यासाठी नियम पाळणे गरजेचे आहे
शासनाच्या 2 नव्या गाईडलाइन – संपूर्ण माहिती
राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजनेबाबत 2 महत्त्वाच्या गाईडलाइन प्रसिद्ध केल्या आहेत. या गाईडलाइन पूर्ण केल्या नाहीत, तर पुढील हप्ते थांबवले जाऊ शकतात.
गाईडलाइन 1: प्रतिज्ञापत्र (Declaration Form) सादर करणं आवश्यक
शासनाने स्पष्ट केलं आहे की, 65 वर्षांहून अधिक वयाच्या लाभार्थ्यांनी एक प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल. हे प्रतिज्ञापत्र म्हणजे तुमचं स्वतःच्या हाताने लिहिलेलं किंवा नोटरीकडून प्रमाणित पत्र, ज्यात तुम्ही लिहाल: मी एकटा राहतो माझं रेशन कार्ड आणि घर वेगळं आहे. माझ्या मुलांचा/मुलींचा माझ्या देखभालीसाठी काही सहभाग नाही मी स्वतःची जबाबदारी घेतो आणि कोणत्याही प्रकारचा आधार मला मिळत नाही. या पत्रात मुलांची नावंही नमूद करायची आहेत. जर तुम्ही तुमच्या मुलांकडे राहत असाल तर.
हे प्रतिज्ञापत्र का लागणार?
अनेक प्रकरणांत असं आढळून आलं आहे की, लाभार्थी शासकीय मदत घेत असतानाही मुलांच्या छत्रछायेखाली राहत आहेत. त्यामुळे योजनेचा चुकीचा वापर टाळण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.
गाईडलाइन 2: हयातीचा दाखला (Life Certificate)
संजय गांधी निराधार योजना दुसरी गाईडलाइन म्हणजे, हयातीचा दाखला देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. हा दाखला दरवर्षी 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीत सादर करावा लागेल.
हयातीचा दाखला कोण देऊ शकतो? ग्रामसेवक,सरपंच,तहसीलदार, कार्यालयातील क्लास वन अधिकारी किंवा स्वतःच्या हाताने लिहिलेला साधा निवेदन पत्र सुद्धा चालतो
हे प्रतिज्ञापत्र व हयातीचा दाखला कुठे सादर करायचा?
या दोन्ही कागदपत्रे तहसील कार्यालयात सादर करावीत. सरकारकडून लवकरच यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) येणार आहे. सध्या अनेक तहसील कार्यालयांनी पूर्वकल्पनापत्र (Internal Notification) जारी करून तयारी सुरू केली आहे.
आता उशीर करू नका sanjay gandhi niradhar yojana
जर तुम्ही या 2 कागदपत्रांची तयारी केली नाही, तर पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे:
- प्रतिज्ञापत्र तयार ठेवा
- हयातीचा दाखला घेऊन ठेवा
- तहसील कार्यालयात सादर करा
- DBT अॅक्टिव्ह आहे का याची खात्री करून घ्या
निष्कर्ष:
संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभ नियमित मिळावा, यासाठी सरकारने दोन महत्त्वाच्या अटी लागू केल्या आहेत – प्रतिज्ञापत्र आणि हयातीचा दाखला. जर लाभार्थ्यांनी या कागदपत्रांची पूर्तता वेळेत केली नाही, तर त्यांचे हप्त्याचे पैसे अडकू शकतात.
विशेषतः 65 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या लाभार्थ्यांनी स्वतःचा स्वतंत्रपणा सिद्ध करणारे प्रतिज्ञापत्र तहसील कार्यालयात सादर करणे गरजेचे आहे. तसेच, हयात असल्याचा पुरावा दरवर्षी सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. हे दोन्ही कागदपत्रे योग्य प्रकारे आणि वेळेत दिल्यास तुमचा लाभ सुरळीत चालू राहील.